श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
जन्माला आलेला व्यक्ती मृत पावणार हे शाश्वत त्रिकाल बाधित सत्य आहे त्या सोबत बालपण, किशोर पण ,तारुण्य व सरते शेवटी वार्धक्य या टप्प्याच्या आधारे जीवन प्रवास शेवटास पोहचतो.आयुष्यतील कर्तबगारीचा काळ मुलाबाळां साठी खर्च करण्यात जातो .शेवटी वार्धक्य समयी एकटे जीवन कंठण्याची वेळ अनेक कम नशिबी व्यतीवर येते आहे.
सोमवारी शनी मंदिर मानपाडा डोंबिवली येथे सुहासनी राणे यांना सुलोचना घाटे या आजी भेटल्या .आजीचे वय 75च्या आसपास आहे त्यामुळे वार्धक्याचा ज्ञानेंद्रियावर काही प्रमाणात परिणाम जाणवणे साहजिकच होते .आजींना स्वतःचे नाव आठवत होते व मुळ गाव श्रीवर्धन याची आठवण होती परंतु सद्याच्या वास्तव्याची जाणीव नव्हती .अशा कठीण समयी अभिषेक परब व सुहासनी राणे यांनी त्यांना माणुसकीचा हात देत आपली घरी नेले .त्यांची योग्य विचारणा करून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया वर आजीबाई चा फोटो व त्यांच्या स्मृतीतील मुळ गाव श्रीवर्धन चा पत्ता पोस्ट करण्यात आला .व्हाट्सउप च्या माध्यमातून एका रात्रीत आजी बाई प्रत्येक घराघरात पोहचल्या .आजीचा मुलगा विलास घाटे यांचा शोध घेण्यात अभिषेक परब यांना यश मिळाले .त्या नंतर आजी व्यवस्थित पणे स्वगृही परतल्या आहेत .सुहासनी राणे व बंधु अभिषेक परब समाज कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत .या पुर्वी त्यांनी असे मालवण वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील गणपत बाळू सावंत यांना असे सुखरूप आपल्या घरी पाठविले होते.
अभिषेक पोलीस मित्र असुन डोंबिवली येथे विटा ग्रानिटो या कंपनीत काम करतात .
आपल्या जन्मदात्याचे पालन पोषण वार्धक्य समयी करणे कायद्यानुसार बंधनकारक ठरत असताना आज ही अनेक कुटुंबात आपल्या मातापित्यां विषयी कृतघ्न वागणुक कायम असल्याचा प्रत्यय येणे निश्चितच माणुसकी साठी काळीमा फासवणारी घटना आहे.बालपणी आपला संभाळ करणाऱ्या आई वडीलांचा वृद्धपकाळी सुयोग्य पद्धतीने पालन पोषण करणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.
-------------------------------------------
मी व माझी बहिण सुहासिनी राणे अनेक वर्षांपासून समाज कार्यात सक्रिय आहोत .मी पोलीस मित्र संघटनेचा सभासद आहे .सुलोचना घाटे आजी यांना त्याच्या राहत्या घरी व्यवस्थित पणे पाठवले याचा आनंद आहे. समाज कार्य हे मी माझे नैतिक कर्तव्य मानतो .
अभिषेक परब ( समाजसेवक डोंबवली )


Abhisekh parab hre maze guru deepak chavahan yanache vidhayarthi aahet
ReplyDeletePost a Comment