श्रीवर्धन आगारातील एस . टी . वाहतुक विस्कळीत : कमी उत्पन्नामुळे मुंबई एसटी केली बंद ; शालेय विद्यार्थीसाठी असणाच्या गाड्या रद्द



दिघी : गणेश प्रभाळे
मागील काही दिवसापासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील एसटी प्रवास कटकटीचा होऊन खिशाला चांगलीच चाटदेणारा ठरत आहे बोर्लीपंचतन येथून सकाळ मुंबई जाणारी एस . टी . बंदकेली आहे ती पुन्हा सुरु करावी अशी मागणी होत असताना त्या मध्ये साध्या गाड्या बंद करुन महागड्या गाड्या सुरु झाल्याने प्रवाश्यांत संताप व्यक्त केला जात आहे . एकीकडे ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून एस . टी . चा आपण मोठ्या अभिमानाने उल्लेख करीत असलो तरी एस . टीचा प्रवास म्हणजे अनंत अडचणींचा सामना होय . याचा प्रत्यय सध्या श्रीवर्धन तालुक्यात येत आहे . श्रीवर्धन आगारातुन मुंबई , नालासोपारा , भांडुप तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात . मात्र गेल्या आठवड्या पासून एस . टी . बसेस बंद असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . बोर्लीपंचतन तसेच दिघी परिसरातुन मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते . बोर्लीपंचतन वरुन सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी मुंबई एसटी बंद करण्यात आली . त्यानंतर मागून येणाच्या दुसर्या गाडीने प्रवास करावा तर ७ वाजता मुंबई व मिरज साठी सेमी लक्झरी सोडण्यात येते . या मागुन येणारी ८ वाजता नालासोपारासाठी शिवशाही असल्याने तिन्ही गाड्यांचे तिकीट दर जादा आहेत . यामुळे सर्व सामान्य माणसाला परवडत नसून अशा महागडा प्रवासामुळे मुंबई व लोकल प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . बोर्लीपंचतन येथून विद्यासाठी सुटणारी एस टी . आलीच नाही . विचारना केली असता गाड्या रद्द केल्याची माहिती मिळाली . 

साध्या बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी..
गाड्या श्रीवर्धन बोर्लीपंचतन मुंबई ही गाडी चार दिवसांपासून आलेली नाही . मुंबई गाडी बंद आहे हे सांगण्यात आले याशिवाय लोकल एस . टी . देखिल मोठ्या प्रमाणात उशिराने येत आहेत . मुंबईला जाणाच्या बसेस अचानक बंद केल्या जातात बस रद्द केल्याची कोणतीच पूर्व कल्पना प्रवाश्यांना नसते . त्यामुळे सर्व सामनासह बस स्टॉपवर आलेल्या प्रवाश्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करवा लागतोय . उशिरा धावणाऱ्या बसेस , वेळेवर न सुटणाऱ्या बसेस याचा सर्वात जास्त फटका बसतो तो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना . शाळा कॉलेजला उशिरा पोहचणे , शिवाय महागड्या गाड्यांचा तिकीट दर जादा असल्याने व शालेय वेळेत हा प्रकार होत असल्याने एस . टी . ची वाट पाहण्या ऐवजी विद्यार्थी व लोकल प्रवाशी कमी भाडे असणारी खाजगी वाहने वापरतात . 


कित्येक वर्ष मुंबई गाडीने आम्ही प्रवास करत आहोत . मुंबई गाडी बंद झाल्याने मुंबई जाण्यासाठी एक दोन तासानी सुटणाऱ्या गाड्यांमुळे पोहचण्यास उशीर होत असल्याने म्हसळा , माणगाव येथे जावून एसटी पकडायला लागते . मात्र , गाडीमध्ये गर्मी होत असल्याने पर्यायी खाजगी वाहनाचा आधार घेत मुंबई प्रवास करणे भाग पडत आहे.
-शिवा रीळकर बोर्लीपंचतन , मुंबई स्थायिक . 

प्रवाशी संख्या नसल्याने मुंबई एसटी बस बंद करण्यात आली आहे . कमी प्रवाशांसाठी बस कशी चालवणार . पंढरपूर यात्रेसाठी साध्या गाड्या देण्यात आल्या आहेत . येत्या २६ , २७ तारखे पर्यंत बंद केलेल्या बस पुन्हा सुरु केल्या जातील बस सुरु करण्या अगोदर प्रवाशांना कळवले जाईल .
- रेश्मा गाडेकर , श्रीवर्धन आगार प्रमुख . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा