श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व प्रवास हे नवीन समीकरण निदर्शनास येते आहे. आठवड्यापुर्वी पडलेल्या पावसाने सार्वजनिक बांधकाम खाते ,जिल्हापरिषद बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळ यांच्या कामाच्या गुणवतेच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर अगणित खड्डे पडल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील सर्व मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे .त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. श्रीवर्धन ते बागमांडला 24 किलोमीटर अंतर आहे .सदर मार्गावर हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे .बागमांडला येथून बोटीद्वारे वेळास व बाणकोट जाण्याची व्यवस्था आहे त्यामुळे या मार्गावर सदैव गर्दी असते.श्रीवर्धन कोलमांडला मार्गे बागमांडला रस्त्याची स्थिती भयानक आहे .सर्वत्र खड्डे च निदर्शनास येत आहेत .त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे .गालसुरे ,साखरी, जावेळे ,धारवली व आडी या मार्गावर वाहतुक प्रमाण कमी आहे .
श्रीवर्धन दिघी हे 30 किलोमीटर अंतर आहे .आराठी ग्रामपंचायत ते दिघी सर्वत्र खड्डेच खड्डे दृष्टीस पडतात. लाल माती व चिखल यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.श्रीवर्धन ते दिघी दरम्यान चिखलप , शिरवणे,हुन्नरवेल,दांडगुरी, आसुफ ,खुजारे ,बोर्लीपंचतन, वडवली, वेळास ,व कुडगाव ही मुख्य गावे आहेत .दांडगुरी ते बोर्लीपंचतन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मातीच्या भरावा मुळे वाहने चिखलात रुतण्याची दाट शक्यता आहे . बोर्लीपंचतन ते वांजळे दरम्यान खड्डयांची संख्या वाढल्यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते आहे .रस्त्यावरील खड्डयांचे निर्मुलन लवकर करण्यात आले नाही तर वांजळे मार्गावरील एस टी वाहतुक बंद होण्याचा संभव आहे .त्याचा फटका विदयार्थी व वांजळे ग्रामस्थांना बसू शकतो कारण दुसरी दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध नाही . धनगरमलई , नागलोली ,बोर्ला, वावे रस्त्यावर लाल मातीमुळे चिखल झाला आहे .अगोदर खड्डे व पावसामुळे डोंगराची लाल माती यामुळे वाहने रस्त्यावरून घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. दिघी पोर्ट च्या म्हसळा गोनघर मार्गे दिघी वाहतुकी मुळे मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे .अवजड वाहतुक रस्त्यासाठी मारक ठरत आहे .तसेच श्रीवर्धन शेखार्डी मार्गे दिवेआगार रस्ता वाहतुकी साठी त्रासदायक ठरत आहे .सदर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचा त्रास दिवेआगारच्या गणेश दर्शना साठी जाणाऱ्या भक्तांना होत आहे . त्यामुळे सर्वसामान्य माणूस व वाहन चालक बेजार झाले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटनास वाव मिळत आहे. त्यामुळे लाखो पर्यटक श्रीवर्धन भेटीस येतात .श्रीवर्धन शहर ,हरिहरेश्वर, दिवेआगार, दिघी ही पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे आहेत त्या कारणास्तव लाखो रुपयांचा पर्यटक निधी तालुक्यास प्राप्त होत आहे.हरिहरेश्वर ला भाविक व पर्यटक यांची सदैव गर्दी असते हरिहरेश्वर ग्रामपंचायतला प्रत्येक वर्षी जवळपास 3 लाख रुपयांचा पर्यटन निधी प्राप्त होत आहे.श्रीवर्धन नगरपरिषद महिन्याला 70 हजार रुपयांचा पर्यटन निधी जमा करत आहे .तसेच सुवर्ण गणेशाचे दिवेआगार वर्षा ला 3 लाख रुपये पर्यटकांकडून मिळवत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी मुख्यत्वे कुणाची आहे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.रस्त्यावरील खड्ड्याचा वाईट परिणाम पर्यटनावर होऊ शकतो . रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी मुख्यत्वे कुणाची आहे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. तसेच तालुका आढावा बैठकीस बांधकाम खात्याचे अधिकारी गैरहजर असल्याचे समजते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्याचा वाईट परिणाम पर्यटनावर होऊ शकतो .
--------------------------------------------
रस्त्यावरील खड्डयांची संख्या जास्त आहे त्यामुळे एस टी चालकांच्या समस्येत वाढ झाली आहे त्या संदर्भात अनेक तक्रारी चालकांनी संघटने केल्या आहेत .त्या विषयी आम्ही रा .प .प्रशासन कडे चालकांच्या व्यथा मांडल्या आहेत .तरी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी आमची मागणी आहे.
राजेंद्र बडे (एस टी कामगार संघटना अध्यक्ष श्रीवर्धन)
-----------------------------------------
श्रीवर्धन ते बोर्लीपंचतन या मार्गावर माझी विक्रम नियमित वाहतुक करते .सदर मार्ग वाहतुकीसाठी अतिशय त्रासदायक झाला आहे .रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीचा भराव डांबरी रस्त्यावर येत आहे. तसेच सगळी कडे खड्डे पडल्यामुळे वाहनात अनेकदा बिघाड होत आहे .
अविनाश मोरे (विक्रम चालक मालक श्रीवर्धन)
------------------------------------------
बोर्लीपंचतन ते दिघी रस्ता वाहतुकीस पुर्ण पणे अयोग्य झाला आहे .रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे .त्यामुळे प्रवाशी व स्थानिक लोक यांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.लोकांना मोठया प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चंद्रकांत पांडुरंग बिराडी (तंटा मुक्त गाव अध्यक्ष वडवली )
------------------------------------------सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षा मुळे तालुक्यातील सर्व रस्त्याची वाईट परिस्थिती झाली आहे .बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाला जनतेविषयी आस्था नसल्याचे दिसून येत आहे .दिघी व म्हसळा रस्ता भयानक बनला आहे .लवकरच खड्डे बांधकाम खात्याने बुजवावेत अन्यथा जनतेत उद्रेक होईल .
शाम भोकरे (शिवसेना जिल्हा उपप्रमुख रायगड )
--------------------------------------------
दिघी पोर्ट च्या अवाजवी अवजड वाहतुकीमुळे वडवली रस्ता खराब झाला आहे. दिघी पोर्ट ने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवणे नियमानुसार बंधनकारक आहे .वास्तविक बघता सदर चा रस्ता हा सिमेंट बांधणे गरजेचा आहे .दिघी पोर्ट ने जनभावना लक्षात घेऊन तात्काळ कामास सुरुवात करावी .
दर्शन विचारे (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीवर्धन)
Post a Comment