निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज - महादेव पाटील


म्हसळा : वार्ताहर
सध्याच्या परिस्थितीत पर्यावरण संतुलन फारच बिघडल्याने रोजच्या रोज नैसर्गिक काही ना काही वाईट घटना घडतात याला कारण आपणच आहोत कधी पाऊस जास्त पडतो तर कधी उन्हाळा जास्त निसर्गाचा समतोल बिघडल्याने ते सावरण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे तरच ग्लोबल वार्मिंग सारखी येणारी भीती नष्ट होण्यास मदत होईल असे मनोगत माजी सभापती श्री महादेव पाटील यांनी जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे आगरवाडा येथे वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले . या वेळी कार्यक्रमाला सरपंच श्रीमती इशरत फकिह , म्हसळा एपीआय पी . ए . कोल्हे , वनपाल श्री थळे वनरक्षक भागवत , माजी सरपंच श्री मनोज नाक्ती , माजी सरपंच श्री अनंत नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले . या वेळी जिजामाता शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वर्गानि लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कांबळेकर सर यांनी केले तर आभार अंकुश गाणेकर यांनी मानले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा