म्हसळामधील कौशल्य विकास वाऱ्यावर : आयटीआयची इमारत गळकी तर शिक्षकांची अनेक पदे रिक्त


दिघी : वार्ताहर
म्हसळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कायम वाढती राहिली आह असे असूनही शासनाच्या दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्षे याठिकाणी अनेक पदे रिक्त ठेवली गेली आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होणार कसा ? असा प्रश्न विचारला जात आहे आयटीआय म्हसळा येथे उपलब्ध सहा व्यवसायांपैकी इलेक्ट्रीशियन , वेल्डर , प्लंबर या व्यवसायांचे निर्देशकपद बदलीमुळे रिंक्त झाले आहे शिवाय कनिष्ठ लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे ही रिक्त आहे येथील वर्कशॉप सायन्स व अभियांत्रिकी चित्रकला विषयाचे निदेशक पद तसेच गटनिदेशक पदही अनेक वर्षे रिक्त असल्याचे समजले . जिल्ह्यात महाड पेण , कर्जत , तळा आयटीआय सोडून सर्वत्र गणित चित्रकला निदेशक पद रिक्त आहेत . पदे भरली नाहीत , तर इथल्या मुलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही व अशा अप्रशिक्षित तरुणांना भविष्यात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावेल . प्रशिक्षणाची वर्षे वाया जातील . स्थानिक तरुणांना उद्योगांमध्ये कुशल कारागीर म्हणून नोकऱ्या मिळाव्यात , तरुणांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे म्हणून शासनाने तालुकानिहाय आयटीआय काढल्या आहेत . पण असंख्य रिक्त पदांमुळे येथील रोजगार व स्वयंरोजगाराचा बट्ट्याबोळ उडणार आहे . १० वी - १२ वीनंतर अनेक जण व्यावसायिक शिक्षणाकडे वळतात . याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आयटीआयची निर्मिती झाली आहे . औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शासकीय तांत्रिक विद्यालय यामधून व्यवसायिक शिक्षण घेतल्यानंतर रोजगार तसेच स्वयंव्यवसायाची संधी प्राप्त करता येते . यामुळे आयटीआय आणि व्यवसायावर आधारित शिक्षण देणार्या संस्थांची मागणी वाढली आहे गेल्या अनेक वर्षात म्हसळा आयटीआय . मधून महाड , माणगाव , तळा म्हसळा मुरुड आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षण घेऊन रोजगार निर्माण केला आहे . जिल्ह्यातील सर्वच आयटीआय संस्थेत परिस्थिती आहे.


इलेक्ट्रीशियनचा चार्ज फिटरकडे...
इलेक्ट्रशियन व्यवसायाचा चार्ज फिटर निदेशकाकडे आणि प्लंबरचा चार्ज वेल्डर निदेशकाकडे अशीच अवस्था जवळपास जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अपुरे ज्ञान घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत . 

इमारत गळकी...
महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका व्यावसायिकाने वरवठणे येथे म्हसळा आयटीआयची इमारत बांधली . या इमारतीला ४ वर्षे होत आली . दरवर्षी पावसाळ्यात भिंतीतून पाणी पाझरताना दिसते . यावरून बांधकाम व्यावसायिक व बांधकाम खात्याचे अभियंते यांच्या बांधकाम ज्ञानाविषयी प्रशचिन्ह उपस्थित होत आहे


बदलीमुळे शिक्षकांचे पद रिक्त आहेत . नवीन नियुक्ती होतील. इमारत गळतीबाबत श्रीवर्धन येथील सार्वजनिक अधिकार्यांना बांधकाम खात्याच्या कळविले आहे .
-पी . एम . बिरार प्राचार्य , म्हसळा आयटीआय 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा