म्हसळा : प्रतिनिधी
माणगाव - दिघी राष्ट्रीय मार्गाचे काम एम . एम . आर . डी . ए . च्या माध्यमातून सुरु आहे . नव्याने रस्ता करताना पावसाळ्या पर्यंत ठेकेदाराने योग्य नियोजन करून काम करणे आवश्यक असताना एक ना घड भाराभर चिंध्या असे काम केले आहे तर एम . एम . आर डी . ए . च्या ताब्यातील दिघी पर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे . तो रस्ता व खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा कामच करू नये आसा अभ्यासू सल्ला म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यांनी शासनाला दिला आहे . माणगाव ते चांदोरे पर्यंत रस्ता नव्याने करताना अनेक ठिकाणी अपघाती पॉईंट तयार झाले आहेत . या भागात मागील १ महीन्यात छोटे - मोटे अपघात आले , तर देवघर , तोंडसुरे , म्हसळा बायपास , वरवठणे , आगरवाडा, बनोटी , खरसई . मेंदडी , खानलोशी , गोंडघर , वेळास , कुडगांव , करलास या भागातील रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत . म्हसळा माणगाव हा तीस कि.मी . चा रस्ता पार करायला खाजगी वाहनाना १ तास , तर प्रवासी वाहमाना दीड ते दोन तास लागत आसल्याचे सांगण्यात आले
सदरचा रस्ता हा जास्तीत जास्त १९ टनाचे वाहतुकीचा असताना या रस्त्यावरून ३० ते ४५ टनाचे मालाची वाहतुक का केली जाते . त्यांच्यावर पोलीस अगर आर . टी . ओ . कडुन कारवाई का होत नाही..?
महादेव पाटील, माजी समापती , पं . स . म्हसळा

Post a Comment