दिघीचा चिमुकला पंढरीच्या वारीत...


दिघी : वार्ताहर
पंढरीची वारी , आहे माझ्या घरी असा भक्तिमय सूर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचे रहिवासी हरेश दिघीकर यांच्या कुटुंबातील चिमुकल्याच्या दिंडीत सहभागामुळे ऐकू येत आहे दिघीतील हरेश दिघीकर हे वारकरी आहेत . त्यांचा मुलगा ज्ञानराज चार वर्षांचा असून तो यंदा तिसऱ्यांदा पंढरीची वारी करत आहे अडीच वर्षाचा असताना त्याने पहीली वारी आपल्या आई हिरकणी आणि वडील हरेश यांच्यासोबत आईच्या कडेवर आणी वडिलांच्या खांद्यावर केली . त्यावेळी थोडाफार प्रमाणात चालला . दुसऱ्या वारीत त्याचे चालण्याचे प्रमाण वाढले असून ही वर्षी तिसरी वारी तो करत आहे यावेळी वारकरी वेशात चंदणाचा टीळा लाऊन पालखीसोबत वारीत सहभागी झाल्याने ज्ञानराज या चिमुकल्या वारकर्यांनी दिंडीतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा