न्याय, समता आणि मानवता यांच्याशी झुंज देणारा महामानव कै.वसंतराव नाईक यांची जंयती म्हसळा महाविद्यालयात साजरी

प्रतिनिधी, म्हसळा
बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित म्हसळा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भावपुर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात  कै.वसंतराव नाईक यांची जंयती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.श्री. जाधव एम.एस  होते या जंयती  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.समेळ शिरीष यांनी केले त्यामध्ये त्यांनी वसंतराव नाईक यांचा जीवन परिचय करून देताना वसंतराव नाईक यांनी आपल्या  मुख्यमंत्री कारकिर्दीत शेती उत्पादन वाढीच्या संदर्भात घेतलेले निर्णय आणि त्याचा शेती उत्पादनावर झालेला चांगला परिणाम तसेच रोजगार हमी योजना,कापुस एकाधिकार खरेदी योजना,कृषी विद्यापीठाची स्थापना याबाबत सविस्तर वर्णन केले त्यानंतर महविद्यालयातील लिपिक मा.श्री.सुभाष साळवे यांनी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले त्यानंतर महाविद्यालयातील कोकण वसंत या नियतकालिकेचे मुख्य संपादक राय्यप्पा माशाले यांनी कै.वसंतराव नाईक यांनी बंजारा समाजाची त्याकाळातील परिस्थिती आणि त्या समाजाची आधुनिक समाजाशी ओळख करून देण्यासाठी कै.वसंतराव नाईक यांनी केलेले कार्य तसेच महाराष्ट्रात राज्य लाँटरी सुरु करण्यामागील कै.वसंतराव नाईक यांचा असणारा दृष्टिकोन याबाबत माहीती देऊन कै.वसंतराव नाईक यांच्या रूबाबदार पोशाखा संदर्भात आणि त्याच्या संपुर्ण राहणीबाबत माहीती दिली जंयती कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्यने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी सर्वाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा