संजय खांबेटे, जेष्ठ पत्रकार म्हसळा
दळणवळणाच्या विविध साधनांची उपलब्धतेला अनन्यसाधारण महत्त्व असते , त्यामुळे त्या परिसरातील औद्योगिक , आर्थिक , सामाजिक व राजकीय प्रगतीचे मोजमाप रस्ते व अन्य वाहतुकीच्या या विविध साधनांच्या प्रगतीवरुन केले जाते . श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात होणारा दिघी- पुणे राष्ट्रीय महामार्ग व श्रीवर्धन - म्हसळा - लोणेरे रस्ता रा . म . ९९ व अलिबाग रोहा - कणघर - वावे रस्ता रा . मा . ९१ किमी या दोन रस्ते हायड्रेड अॅन्युटी रस्त्यांमुळे खच्या अर्थाने या दोनही तालुक्यांचा आर्थिक विकास होणार व त्याच बरोबरीने प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे . सर्व साधारणपणे रस्त्यांची पुढीलप्रमाणे वर्गवारी असते राष्ट्री महामार्ग , राज्य महामार्ग , प्रमुख जिल्हामार्ग , इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग अशी असते . राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केंद्राच्या संबंधित विभागाकडून व त्यांना मदत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असते , राज्य मार्गाची निर्मिती , देखभाल व दुरुस्ती राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग करते , प्रमुख जिल्हामार्गाची निर्मिती , देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभग करते तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाची निर्मिती व देखभाल व दुरुस्तीचे काम जिल्हा परीषद बांधकाम विभाग करीत असते . नव्याने मंजूर झालेला दिघी पुणे राष्ट्रीय महामार्ग व श्रीवर्धन - म्हसळा - लोणेरे रस्ता व अलिबाग - रोहा - कणघर - वावे हे हायड्रेड अॅन्युटीच्या पद्धतीने होणारे रस्ते वगळता तालुक्यात म्हसळा - पाभरे - वाशी राज्य मार्ग क्र . ९६ सुमारे ११ किमी , आंबेत - बागमांडला राज्य मार्ग क्र . १०० सुमारे ४५ किमी , आहेत . प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून कुडगाव - हरवीत - तुर्बाडी क्र . ५८ हा सुमारे १६ किमी , कासरमलई - ताम्हने शिर्के क्र . ५९ सुमारे ६ .५ किमी , म्हसळा - तळवडे क्र . ७१ सुमारे १२ किमी अस्तित्वात आहेत.
म्हसळा - श्रीवर्धन तालुक्यातील हे सर्व रस्ते सुरूवातीला बैलगाड्या व सुमारे ७ ते १० टन वजनाच्या दिवसभरातून ८ ते १० गाड्या जातील याच क्षमतेचे होते व फक्त उन्हाळी वाहतुकीचे होते . म्हणून बहुतांश मार्गावर दगडी बांधकामाच्या मोऱ्या अगर छोटे स्लॅब ड्रेन स्वरुपात होते , जिल्हा परीषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित रस्ते हस्तांतरीत केल्यानंतर रस्त्यांचे मजबुतीकरण , डांबरीकरण , छोटे मोठे पूल अशा स्वरुपात बदल झाले . ते बदल होत असताना सर्वसाधारणपणे रस्त्यांचा व पुलांचा दर्जा १९ टन वाहतुकीच्या क्षमतेचा बनविण्यात आला आसल्याची तांत्रिक माहिती आहे . तालुक्यातील बहुतांश राज्यमार्गाच्या रस्त्यावरुन मागील पाच ते १० वर्षात किमान १० ते १६ टायरच्या गाड्या व वाहतूक क्षमता १९ ते ४५ टनाने असलेल्या वाहनाने होत असते त्यामुळे तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय व पूल मोडकळीस आलेले आहेत .
दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग व हायब्रीड अॅन्युट रस्त्यांमुळे दोनही तालुक्यांचा आर्थिक विकास
तालुक्यांचा होणार आर्थिक विकास दिघी येथील बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होत असतानाच पायाभूत व आवश्यक वाहतुकीची साधने मिळण्यासाठी व पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी उचललेले महत्वाचे पाऊल ठरणार आहे दोनही तालुक्यांची कायापालट करणारा दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग घोषीत केल्याने व माणगाव - दिघी या पहिल्या टप्प्यातील काम सुरु झाल्याने रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर आधारीत सुलभ झालेले रस्ते वाहतुकीचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाने ( जीडीपी ) मोठी झेप घेण्यात योगदान ठरणार आहे. दुसर्या बाजूने जलवाहतुकीचा पर्यायसुद्धा सुरु होत आहे . केंद्र सरकारने सागरमाला प्रकल्पाचे माध्यमातून विकासाचे जे ध्येय उराशी बाळगले आहे या परिसरातील दिवे आगर येथील सुवर्ण गणेश मंदिर , श्री क्षेत्र हरिहरेश्वर , श्रीवर्धन येथील पेशवे मंदिर , सोमजाई मंदिर या परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड वाढणार आहे त्यातूनच दिघी बंदर स्मार्ट व्हावे , अशी स्थानिकांची मागणी आहे केंद्र सरकार देशाच्या वाहतूक व्यवस्थेकडे अधिक सक्षमतेने पाहत असताना , त्यामध्ये जलवाहतूकीकडे विशेष लक्ष त्यामध्ये जलवाहतुकीकडे विशेष लक्ष केंद्रीत असताना बंदराला रेल्वे मार्ग जोडण्याचे केंद्राचे प्रस्तावित आहे तर दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत आहे व काम सुरु आहे म्हसळा तालुक्यातील तुर्बाडी रोहिणी या भागात शिप बिल्डींग , शीप ब्रेकींग यार्ड अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यवसाय सुरु होणार असल्याने त्या पद्धतीने आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करणे हे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे म्हणूनच रस्त्यांच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे . राष्ट्रीय विकासासोबत म्हसळा - श्रीवर्धनचा आर्थिक विकास होणार आसल्याचे संकेत आहेत .

Post a Comment