कोळी समाजाच्या उत्थाना साठी शाश्वत विकासाची गरज ; बारमाही रोजगार निर्मिती चा यक्षप्रश्न


● कोळी समाजाच्या उत्थाना साठी शाश्वत विकासाची गरज
● "शिक्षण , आरोग्य व  स्वच्छता "या मध्ये जनजागृतीची नितांत आवश्यकता
● बारमाही रोजगार निर्मिती चा यक्षप्रश्न

श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

देशाने स्वातंत्र्याची सत्तरी पार केली आहे .परंतु अद्याप ही देशातील अनेक घटक सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करतांना निदर्शनास येतात .महाराष्ट्रातील कोळी समाज त्याचे  द्योतक आहे .कोळी समाजाच्या उत्थानासाठी शाश्वत विकासाची नितांत आवश्यकता आहे. सरकार दरबारी अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येतात .त्या अनव्ये कोळी समाजाच्या प्रगती साठी प्रयत्न केल्याचे समजते परंतु ते प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत. कोळी बांधवांची आजची परिस्थिती लक्षात घेता अनेक बाबी पासून कोळी समाज मागास असल्याचे दिसून येत आहे .त्या मध्ये शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे .व्यक्ती किंबहुना समाजाच्या प्रगतीत शिक्षणाचे महत्त्व अग्रणी असते .कोळी समाजाच्या शिक्षणाचा आलेख उत्तरोत्तर वाढल्याचे दिसून येतो परंतु सदर चे शिक्षण हे एका मर्यादित कक्षे पर्यंत आहे .माध्यमिक शिक्षणा नंतर शिक्षणास पुर्ण विराम मिळत आहे .उच्च शिक्षणातील टक्केवारी अतिशय अल्प असून भविषया विषयी आत्मचिंतनास  कार्यप्रवण करणारे आहे .कोळी समाजाचा अधिवास हा जात प्रमाणपत्रा साठी कळीचा मुद्दा ठरत आहे .खरे पाहता अधिवास हाच विकास मारक ठरत आहे .कारण मानसिक दृष्टीकोनाची निर्मिती ही व्यक्ती किंवा समाजाची  त्याच्या सभोवताली असलेल्या परिसरात दडलेली असते असे म्हणतात .समाजास शिक्षणाचे महत्त्व अद्याप समजलेले नाही असे चित्र आहे .स्वच्छता व आरोग्य या संदर्भात कोळी समाज उदासीन आहे .कारण समुद्राच्या जवळ असलेले वास्तव होय .खाडी पट्टा ,नदी ,तलाव व समुद्र या मासळी स्रोतांच्या लगत कोळी बांधव निवास करतात .नैसर्गिक व मानव निर्मित प्रदूषकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सामना कोळी बांधव करतात त्याचा परिणाम आरोग्य व स्वच्छतेवर झाल्याचे दिसून येते. पारंपरिक पद्धतीने बांधलेली कौलारू घरे व त्याच्या सोबत आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या घरात मासळीचा वास  सदैव नांदत असतो .
    सरकार दरबारी स्वच्छता अभियान  जोरदार राबवले जातात परंतु त्याचा वारू क्वचित प्रसंगी कोळी वाड्यांतुन जातो .पर्यायाने अस्वच्छतेचे साम्राज्य वाढीस हातभार लागतो .समाजात पूर्वापार परंपरेच्या नावा खाली जोपासलेली अंधश्रद्धा आज ही आपले स्थान बळकट असल्याचे सांगत आहे .सामुदायिक ऐक्य सण ,उत्सव साजरा करताना दिसतात परंतु समाजकल्याणा साठी समाज  अद्याप एकत्र आलेला नाही असे समजते .समाजात उच्च शिक्षण घेतलेला घटक समाजा पासून दुरावत स्वःताची सामाजिक जबाबदारी स्वीकारत नसल्याचे दिसून येते. काळानुरूप आहार पध्द्ती ,पेहराव या मध्ये बदल करण्यात समाज यशस्वी झाला आहे.


        कोळी समाजाच्या प्रत्येक घटका समोर बारमाही रोजगाराचा यक्षप्रश्न सदैव उभा आहे त्या वर शासन व समाज आज पर्यंत उपाय शोधण्यात यशस्वी झाल्याचे दिसत नाही. समाजातील सर्व सामान्य घटक स्थानिक बाजारात मासळी विक्री करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवताना दिसत आहे . उलट समाजातील बोटींचे मालक ( नाकवा ) व विक्रीतील दलाल आज सधन झाले आहेत .काबाड कष्ट करणारा घटक उपेक्षित जीवन जगत आहे .  खलाशांना दरमहा मिळणारे वेतन  बोटींचे  मालक ठरवतात .मासळी गाव पातळीवर व  कंपनी यांना विकली जाते.समाजातील सामान्य व्यक्ती बोटीच्या मालकाकडून खरेदी केलेली केलेली मासळी गावच्या मच्छिमार्केट मध्ये व फेरी च्या पद्धतीने विकतात.त्या द्वारे प्राप्त पैशातून  संसाराचा उदरनिर्वाह चालवला जातो .बाजार भाव , वाहतूक व्यवस्था यांची शाश्वती नसते .ग्रामीण भागात खाजगी टेंम्पो व एस टी  माध्यमांचा वापर केला जातो . ओली मच्छि विकण्यासाठी सर्वसामान्य कोळी बांधवा साठी तारेवरची कसरत करावी लागते .शेती साठी हमीभाव दिला जातो त्या पद्धतीने किंवा तत्वतः मासळीला हमीभाव देणे भविष्यात शक्य होईल का हा प्रश्न आहे .नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करत त्या मधील सजीव सृष्टीची जोपना करणे काळाची गरज आहे .प्रदूषणामुळे मासळी उत्पन्ना वर परिणाम झाला आहे. त्याचे चटके कोळी बांधव सोसत आहेत .तसेच मासळी व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनांची परिपूर्ती करण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलली पाहिजेत . आजमितीस कोळी समाज व्यवसायासाठी सर्व खर्च स्वतः करत आहे .पर्यायाने त्याचा परिणाम समाजातील कनिष्ठ घटका पर्यंत जाणवत आहे  . डिझेल माफक दरात उपलब्ध होणे आवश्यक आहे त्या सोबत बोट बांधणी व दुरुस्ती साठी शासनाच्या वतीने योग्य मदतीची गरज आहे .कोळी बांधव वर्षातील आठ महिने मासळी चा उद्योग करतात परंतु उर्वरित चार महिने हातास काम नसते .बोट मालक    जाळे व   बोट दुरुस्तीच्या कामात व्यस्त असतात परंतु त्या व्यतिरिक्त इतर  कोळी समाजातील घटक चार महिने कामाशिवाय बसलेले असतात. त्या कारणे मासळी व्यवसायात आगामी काळात आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. जेणेकरून समाजातील प्रत्येक घरात पर्याप्त पैसा पोहचू शकेल .शेती , दूध व साखर उदयोगा प्रमाणे सहकारी तत्वावर मासळी  व्यवसायाची उभारणी करण्यात आल्यास निश्चितच कोळी समाजाच्या सर्वागीण विकासास पुरक असेल अशी आशा बाळगण्यास जागा आहे .
------------------------------------------------------------------

आपल्या सागरी क्षेत्रात एल इ डी व मर्फी मच्छिमारी केली जाते त्यामुळे सामान्य मच्छिमार व्यक्तीवर उपास मारीची वेळ येत आहे .शासन त्या संदर्भात उदासीन आहे .कोळी बांधव अतिशय कठीण परिस्थिती जीवन जगत आहेत .
    हरिदास वाघे (मच्छिमार श्रीवर्धन )
-------------------------------------------

प्रत्येक वर्षी आम्हाला धंद्यात नुकसान च जास्त होत आहे .जाळे, होडी यांच्या दुरुस्ती साठी मोठया प्रमाणात खर्च येतो परंतु शासन आम्हास काहीच देत नाही .डिझेल वरची सबसिडी एक वर्षांपासून मिळाली नाही .शेतीकऱ्याच्या मालाप्रमाणे आमच्या मासळीला हमीभाव मिळाला पाहिजे .
  - योगेश नांदगावकर (मच्छिमार श्रीवर्धन )
------------------------------------------

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट मुळे आमच्या समाजाच्या रोजगारावर संकट आले आहे .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या   आदेशानुसार   जेएनपीटी च्या धर्तीवर स्थानिक कोळी बांधवांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे .दिघी पोर्ट मुळे आमच्या समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे .
    -महेंद्र चोगले ( कोकण विभाग समनव्यक प्रमुख महाराष्ट्र)
------------------------------------------------------------------

विद्यमान राज्य सरकार कोळी समाजच्या संदर्भात उदासीन आहे याचा वेळोवेळी सर्वांना प्रत्यय येत आहे .कोळी बांधवांना जी  एक वर्षा पासून डिझेल वरती जी सबसिडी मिळाली नाही  त्या संदर्भात राज्याच्या अर्थ मंत्र्यांशी संवाद साधला जाईल तसेच आगामी अधिवेशनात मी व आमदार  अनिकेत तटकरे संदर्भित प्रश्न उपस्थित करून कोळी बांधवांना न्याय मिळवून देऊ .
       सुनील तटकरे (आमदार विधान परिषद )
---------------------------------------------------------------

शिवसेना कोळी बांधवाच्या पाठीशी ठाम पणे उभे आहे .पक्ष प्रमुखांनी अनेक वेळा कोळी समाजाला मदत केली आहे .कोळी समाजाच्या सर्व प्रश्नांची आम्ही सोडवणूक करू .
   सुजित तांदलेकर (विधान सभा संपर्क प्रमुख श्रीवर्धन)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा