म्हसळा : प्रतिनिधी
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य योजना . ही योजना म्हणजे वंचितांच्या घरात प्रकाश आणणारी योजना आहे . या योजनेंतर्गत म्हसळा तालुक्यात अद्यापपर्यंत २२ लाभार्थींना कनेक्शन देण्यात आली असून अत्यंत पारदर्शक सर्वेक्षण करून उद्दिष्ट पूर्ण करणार आसल्याचे म्हसळा म . रा . वि . वि . कंपनीचे कार्यकारी अभियंता यादव इंगळे यांनी सांगितले . देशातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी २५ सप्टेंबर २०१७ ला सौभाग्य योजना सुरू केली . राज्यातील ४१ हजार ९२८ गावांचे , ९८ हजार ३५६ वाड्या पाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले आहे . उर्वरीत घरांचे विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे काम सुरू आहे . मार्च २०१८ अखेर राज्यातील ४१ हजार ९२८ गावांना महावितरणने १०० टक्के वीज पुरविली आहे आता प्रत्येक घरांत वीज पोहचवणे हा उद्देश आहे सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून उद्दिष्टपूर्ती करणे शक्य आहे या योजनेतर्गत गरीबांना मोफत तर इतरांना केवळ ५०० रुपयांत वीज जोडणी देण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण पातळीवर रोजगार निर्मिती होणार आहे .
सौभाग्य योजनेतून तालुक्यातील केलटे , खारगाव कोळे आदीवासी वाडी या परिसरात २२ लाभायना विद्युत कनेक्शन दिले आहे गांव - वाडी पातळीवर पुर्नसर्वेक्षण करून तालुक्यात १०० टक्के काम करून घरा - घरांत वीज पोहचविणार आहोत .
- यादव इंगळे , कार्यकारी अभियंता ,
Post a Comment