म्हसळ्यासह रायगमध्ये नांगरणीला प्रारंभ...


म्हसळा : प्रतिनिधी
मृग नक्षत्राने मान्सूनला रितसर सुरुवात केली आणि रायगड जिल्ह्यातील बळीराजा  सुखावला . जिल्ह्यात ११८ . १६ मि . मी . सरासरी पर्जन्यमान झाले असून , बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी नांगरणीसाठी शेतात उतरला आहे . जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र १ , २४ , १२८ हेक्टर आहे . खरीपामध्ये १० , ४४१ हेक्टरवर नागली , ४१०० हेक्टर तृणधान्य आणि कडधान्य ४०० हेक्टर अशी पिके घेतली जातात . जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कृषी विभागातर्फ २४ मे ते ७ जून या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत ' उन्नत शेती - समृद्ध शेतकरी ‘ पंधरवड राबविण्यात आल्याने या वेळी शेतकन्याना पोषक वातावरण झाले निर्माण आहे प्रतिहेक्टरी पीक वाढविण्यासाठी पाणी , खत , फवारणी , बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके , यांत्रिकीकरण , प्रशिक्षण व अद्ययावत माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे त्यामुळे येत्या चार - आठ दिवसांत शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात लावणीच्या कामाला लागण्याचा अंदाज आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा