...आणि शासकीय गोडावुन झाले पूर्ववत ; तातडीने दुरुस्ती केल्याने मोठी हानी टळली..



श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे गोडाऊन जीवना जेटीच्या ठिकाणी असून त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे आवश्यक असणारे सर्व प्रकारचे साहित्य सामुग्री असते . परंतु १५ जूनपासून पावसाने व वादळी वाऱ्याने श्रीवर्धनकरांना अक्षरश : झोडपून टाकले होते यामध्ये या गोदामाचेही प्रचंड नुकसान झाले होते . मात्र तातडीने दुरुस्ती करत बांधकात विभागाने हे गोदाम पूर्ववत केले आहे १७ जून रोजी संध्याकाळदरम्यान मुसळधार पावसाबरोबर चक्रीवादळ झाले . त्यामध्ये श्रीवर्धन जीवना कोळीवाडा परिसरातील अनंत चाफेकर यांच्या दुकानाचे पत्रे उडाली , मुजामिलशेठच्या ऑफिसचे सर्व पत्रे , दरवाजे वासे उडाले श्रीवर्धन जीवना कोळीवाड्यातील मच्छिमारांना बसण्यासाठी शासनाने बनविलेली शेड तर पूर्ण नादुरुस्त झाली . शेडचे सर्व पत्रे उडाले , परंतु या उडालेल्या शेडचे पत्रे लोकवर्गणी काढून ते बसविण्यात आले . चक्रीवादळाने सर्वात मोठा दणका दिला तो म्हणजे श्रीवर्धन तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामाला . या गोदामाचे अर्धे अधिक पत्रे उडाले . लाकडी खांबे उडाले , त्यामुळे गोदामाचे लाखों रूपयाचे नुकसान होऊन ते उघडे पडले होते . आतील साहित्य , सामुग्री पावसाच्या पाण्याने भिजून शासनाचे मोठे नुकसान होण्याची भिती होती . परंतु , १८ जुन रोजी श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असे वृत्त प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता एस . एम . शेटये यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन शासकीय निधीमधून श्रीवर्धन जीवना जेटीवरील गोदामाला नवीन पत्रे , लाकडी खांबे दुरूस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य याची व्यवस्था करून तातडीने गोदामाची दुरुस्ती केली . त्यामुळे शासनाची मोठी हानी टळली . अन्यथा ह्या मुसळधार पडणाच्या पावसामुळे व वादळी वाघ्यामुळे शासनाचे आणखीन नुकसान झाले असते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा