(फोटो : म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक काते यांची कन्या कु . रसिका अशोक काते हीने ८६ .८० टक्के गुण मिळवित तालुक्यात मागासवर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला .)
म्हसळा -सुशील यादव
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१८ चा निकाल काल दुपारी १वा . ऑनलाईन जाहीर करण्यात आला. म्हसळा तालुक्याचा एकूण निकाल ८९ .६८%, % इतका लागला असून तालुक्यातील २० शाळे पैकी चार शाळेचा १००% निकाल लागला आहे. म्हसळा तालुक्यातून माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०१८ साठी एकूण ९४० विद्यार्थी बसले होते त्यापैकी ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. . तालुक्यातील नेवरूळ , संदेरी , पाष्टी , तळवडे या शाळांचा निकाल १००% लागला असून उर्वरित शाळांचा निकाल पुढील प्रमाणे न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा निकाल ९०.०६% (एकूण विद्यार्थी १५१ उत्तीर्ण १३६),सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत निकाल ८८.८८%(एकूण विद्यार्थी ३६ उत्तीर्ण ३२),अंजुमन हायस्कुल म्हसळा निकाल ९०.७६%(एकूण विद्यार्थी १३० उत्तीर्ण ११८), आयडीयल इंग्लीश स्कूल म्हसळा निकाल ९८.९१%( एकूण विद्यार्थी ९२ उत्तीर्ण ९१) जी एल घोसाळकर खामगाव एकूण निकाल ९५.४५%(एकूण विद्यार्थी २२ उत्तीर्ण २१),न्यू इंग्लिश स्कुल तळवडे निकाल १००% (एकूण विद्यार्थी १२ उत्तीर्ण १२), एम ए आजाद हाय स्कुल पांगळली निकाल ९०.६२% (एकूण विद्यार्थी ३२उत्तीर्ण २९), न्यू इंग्लिश स्कुल खरसई एकूण निकाल ८४.०९ %(एकूण विदयार्थी ४४ उत्तीर्ण३७), न्यू इंग्लिश स्कुल देवघर निकाल ८३.३३%(एकूण विद्यार्थी ४८ उत्तीर्ण ४०),माध्यमिक स्कुल काळसुरी निकाल ९१.३०%(एकूण विद्यार्थी ४६ उत्तीर्ण ४२), न्यू इंग्लिश स्कुल नेवरूळ निकाल १००% ( एकूण विद्यार्थी १५ उत्तीर्ण १५),न्यू इंग्लिश स्कुल पाभरे निकाल ८६.२५% (एकूण विद्यार्थी ८० उत्तीर्ण ६९), मराठी माध्यमिक शाळा वरवटणे निकाल ९५.२३%(एकूण विद्यार्थी२१ उत्तीर्ण २०), मराठी माध्यमिक विद्यालय कोळवट ९३.३३%(एकूण विद्यार्थी १५ उत्तीर्ण १४)ए आय जंजिरा हायस्कुल गोंडघर निकाल ७८.०४%(एकूण विद्यार्थी ४१ उत्तीर्ण ३२), माध्यमिक विद्यालय केलटे निकाल ८७.०९%(एकूण विद्यार्थी ३१ उत्तीर्ण २७), प्रभाकर पाटील विद्यालय पाष्टी निकाल १००% (एकूण विद्यार्थी ३४ उत्तीर्ण ३४), प्रभाकर पाटील विद्यालय संदेरी निकाल 100% (एकूण विद्यार्थी 20 उत्तीर्ण 20), उर्दू माध्यमिक हायस्कुल संदेरी निकाल ८९.४७%(एकूण विद्यार्थी १९ उत्तीर्ण १७), मेंडदी हायस्कुल ७२.५४%(एकूण विद्यार्थी ५२उत्तीर्ण ३७) जिजामाता माध्ययमीक विद्यालय वरवटणे येथील विद्यार्थी कु . शुभम सुरेश नाक्ती याला ९३.२०% गुण मिळवून तालूक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मागासवर्गीयांमध्ये न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा ची विद्यार्थीनी कुमारी रसिका अशोक काते ८६.८०% गुण मिळवून तालूक्यात प्रथम क्रमांक मिळविला . न्यू इंग्लीश स्कुल म्हसळा मधून प्रथम क्रमांक हर्षला मंगेश म्हात्रे(९२.४०%),द्वितीय क्रमांक शुभम संतोष शेवाळे (९१.००%), तृतीय क्रमांक सानिका रमेश लोंढे(८९.८०%) या विद्याार्थ्यांनी मिळविला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सभापती उज्वला सावंत, स्कुल कमिटी चेअरमन समीर बनकर,माजी सभापती महादेव पाटील, गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन करडे ,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे , भाजप तालुकाध्यक्ष शैलेश पटेल , न्यू इंग्लीश स्कुल चे प्राचार्य बी. एन . माळी यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment