प्रतिनिधी,
आगामी होणाऱ्या ८ व्या वर्ल्ड कप व ६ व्या जागतिक विश्वविद्यालय वूडबॉल स्पर्धेसाठी रायगड भूषण पुरस्कार विजेते हेमंत भाऊ पयेर यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने अांतराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रकाश पाटलांनी रायगड भुषण हेमंत भाऊ पयेर यांची भेट घेऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. १९ ते २४ जुलै दरम्यान ६ वी जागतिक विश्वविद्यालय वूडबॉल स्पर्धा मलेशिया येथे होत असून, २४ ते ३० जुलै दरम्यान ८ व्या वर्ल्ड कप वूडबॉल स्पर्धेचे आयोजन इंडोनेशिया येथे करण्यात आले आहे.
Post a Comment