म्हसळयात पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा...


म्हसळा : प्रतिनिधी
वन विभाग म्हसळा , आधार फाउंडेशन अणि संयुक्त वनसमित्या यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा वन विभागातील म्हसळा वनक्षेत्रातील घुम - रुद्रवट , ठाकरोली येथे परिक्षेत्र वन अधिकारी व्ही . एन . पोवळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंगळवारी ( दि . ५ ) जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा याप्रसंगी उपसभापती मधकर गायकर , परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक , ठाकरोली वनसमिती अध्यक्ष पांडुरंग मांडवकर , वनरक्षक बी . जी . सूर्यतळ , वनरक्षक एस . एस . पवार नामदेव घडशी , भारती मोरे , सरपंच , उपसरपंच , ग्रामस्थ , महिला मंडळ आदि मान्यवर उपस्थित होते . करण्यात आला . परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी प्रास्ताविक करताना वनविषयक धोरणे शासनाचे विविध उपक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . आपल्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल व्ही . एन . पोवळे यांनी वन वनांचे महत्व पटवून दिले . वनांच्या वाढीसाठी व वनांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांचे सहकार्य ही अत्यंत आवश्यक बाब असून १३ कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले . यानिमित्ताने महिलांसाठी २00 मिटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . या स्पर्धेत आलेल्या प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांच्या विजेत्यांना बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा