दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील बोलपंचतन येथील शंकर मंदिरा जवळील ट्रान्सफार्मरचे विज खांब खालील बाजूने सडला आहे जीर्ण वीज खांब भरवस्तीत असल्यामुळे कोणत्याही क्षणी तो कोसळून जीवितहानी होऊ शकते . या गंभीर प्रश्नाकडे महावितरणने लक्ष देत ट्रान्सफार्मरचे येथून स्थलांतर करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत . बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिरापलीकडे स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी असल्याने शेती कामासाठी ट्रान्सफार्मर असलेल्या रस्त्याने जावे लागते . दरम्यान वेळोवेळी ट्रान्सफार्मरवर होणाऱ्या शॉटसर्किटमुळे ये - जा करणार्याला व आजुबाजूच्या घरांना ट्रान्सफार्मर | धोकादायक ठरत आहे . भरवस्तीत घराला खेटून असणारा गंजलेले पोल केव्हा तुटून पडेल , हे सांगता येत नाही . त्यामुळे दुर्दैवाने खांब तुटल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . मंदिराजवळील ट्रान्सफार्मरशी जोडले गेलेल्या हजारोंच्या अधिक संखेत ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो . सडलेला विद्युत खांब केवळ समोरील जोडनीच्या आधारावर लोंबकळत आहे एकमेकाला लिंक असलेले हे खांब लगतच्या घरांवर कधीही कोसळू शकतो .
ट्रान्सफार्मर स्थलांतर करण्याची मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून हा खांब जीर्ण अवस्थेत असल्याने ही बाब स्थानिकांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे त्यामुळे ट्रान्सफार्मर स्टेंड येथून स्थलांतर करावे , अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे . सद्यस्थितित बोलपंचतन भागात वीज पुरवठा विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . यामुळे अनेकदा येथील वीज पुरवठाही खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत . तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवात केली असताना परिणामी महावितरणने पावसाळी होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही . यामुळे कुठे आहे आपत्ति व्यवस्थापन असा प्रश्न येथील सामान्यांना पडला आहे
घराजवळ जीर्ण विद्युत खांब असल्यामुळे जीविताला धोका कायम आहे त्यातुन अनेक वेळा शॉटसर्किट होत असल्याने सदर ट्रान्सफार्मरची जागा बदलावी .औदुंबर वेळासकर , बोलपंचतन , रहिवाशी
बोलपंचतन शहरातील जीर्ण वीज खांब बदलण्यात येतील, तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिला आहे .
- अनूप राजपूत , बोलपंचतन विभागीय दुय्यम अभियंता
Post a Comment