दिघी पोर्ट वाहतूकदारांची दहशत कायम ; धावत्या ट्रेलरमधून २० टन कॉईल कोसळली रस्त्यात


म्हसळा : प्रतिनिधी
दिघी - माणगांव रस्त्यावरील वाहतूकदारांची दहशत वाढतेच आहे . मंगळवारी ( दि . ५ ) क्वॉईलची वाहतूक करणार्या ट्रेलरमधील सुमारे २० टनी कॉईल रस्त्यावर मधोमध कोसळली व ट्रेलर कलंडला . या अपघातातून सुदैवाने वाहनचालक बचावला . दरम्यान , ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती . त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रीया म्हसळेकरांमधून व्यक्त होत आहे .
धावत्या ट्रेलरमधून कॉईल पडल्याने मोठा आवाज झाला . त्यामुळे दिवेआगरला जाणारे पर्यटकही आवाजाने तोंडसुरेवरुन माघारी परतले . कुणाला दुखापत नसल्याची खात्री करुन परत आपल्या प्रवासाला निघून गेले . रस्त्यावर पडलेल्या कॉईलचे वजन व गती यामुळे सदर राष्ट्रीय मार्गाचे नुकसान झाले . मात्र कॉईल पडलेल्या ट्रेलरच्या वाहनचालकावर किंवा कंपनीवर म्हसळा पोलिसांतर्फ कोणतीही कारवाई केलेली नाही . अपघात झाला हे खरे असले तरी , कुणाचेही नुकसान व तक्रार नसल्याने गुन्हा नोंदविलेला नाही . वाहतूकदारांना योग्य ती समज देण्यात आली असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले . दरम्यान , याबाबत पुणेकर पर्यटक असलेल्या सणस यांनी सांगितले की , अपघात इतका जबरदस्त होता की , शेजारून जाणाच्या छोट्या कारवर कॉईल पडली असती तर कारचा चंदामेंदा झाला असता . आम्ही ट्रेलर जवळून काही अंतरावर गेलो व ही दुर्दैवी घटना घडली . अन्यथा अनर्थ झाला असता . दिघी पोर्टच्या वाहतूकदारांच्या दहशतीमुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना भिती वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले .


अपघात हा अपघातच आहे त्याची पोलिसांनी कर्तव्याने नोंद करणे क्रमप्राप्त आहे . सदरचा सस्ता हा नव्याने पुणे माणगाव - दिघी असा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित आहे व त्याचे काम सुरु आहे . या मार्गावरील अनेक अपघातांची पोलीस नोंद करीत नाहीत , त्याची चौकशी व्हावी . अपघाताची नोंद व बांधकाम विभागाकडून त्याचा अभ्यास झाल्याने रस्त्याच्या कामात गांभीर्याने सुधारणा होत असते . - महादेव पाटील  माजी सभापती , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा