दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनार्यालगत असनारा दिवेआगर - शेखाडी मार्ग हा पर्यटकांना वेळोवेळी भेट देताना आवर्जुन पहावसं वाटतो . या मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना सुखद आनंद देणारा ठरत आहे त्यामुळे रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते . मात्र , या मार्गावरील शेखाडी ते कोंडविल या अंतरातील रस्त्यालगत असणारे डोंगर पावसाळी धोक्याचा इशारा देत आहेत . त्यामुळे या मार्गाला पावसाळी दरवर्षी दरडींचा धोका असतो . शनिवार रात्री कोंडविल येथे रस्त्यावर दगडी कोसळल्या गेल्या . छोट्या असल्याने रविवारी उशीरापर्यंत तिथेच पडून असल्याचे दिसले रस्त्यालगत दगड कोसळल्यामुळे वाहतूक मात्र सुरू होती . संभाव्य धोका पाहता सार्वजनिक बांधकाम खाते व आपत्ती व्यवस्थापन विभाग या कडे कोणतीच पूर्व तयारी वा खबरदारी घेत नसल्याचे समोर येत आहे . यावेळी स्थानिक प्रशासकीय यंत्रनांनी वेळीच सतर्क होऊन या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे . रायगड जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी व पूर , दरडी कोसळणे , चक्रीवादळे या सारख्या आपत्ती जास्त करुन खाडीलगत गावांना होत असल्याने अनेक अपघाती घटना पावसाळी दरवर्षी समोर येत आहेत . संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला समुद्रकिनार्यांनी वेढले आहे अशाने समुद्राला भरती असेल आणि त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास समूद्रकिनार्यावरील व खाडीलगत गावामध्ये उधाणाचे पाणी शिरून पूर येण्याची शक्यता असते . त्यामुळे तालुक्यातील बोर्ली पंचतन ते श्रीवर्धन या रस्त्याला कार्ले येथे व दिघी ते बोर्ली पंचतन रस्त्याला सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरते व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण होते . याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही , या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.
बांधकाम करण्यासाठी डोंगर पोखरले...
श्रीवर्धन हा पर्यटन तालुका म्हणून नावाजलेला आहे तालुक्यातील समुद्रकिनारपट्टी सौंदयाने सजली आहे विशेषत : श्रीवर्धन समुद्रकिनारपट्टीवरील जमिनी पर्यटन व्यवसाय डोळ्यासमोर ठेवून खरेदी केल्या असल्याने येथील डोंगरावर मानवी आक्रमण झाले . स्वतःच्या फायद्यासाठी काहीजण डोंगर पोखरू लागले . माती विकण्यासाठी तसेच बांधकाम करण्यासाठी डोंगर पोखरले जाऊ लागले त्यामुळे दरडीपासून धोका उद्भवू शकणारी गावे वाढली . श्रीवर्धन तालुक्यातील या गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.
पावसाळी दुर्घटना टाळण्याची मागणी....
कोंडविल येथील परिसरात विस्तीर्ण समुद्र किनारा आहे . येथे तालुक्यात येणार्या पर्यटकांची नेहमीच वर्दळ राहते . जोरदार पावसामुळे श्रीवर्धन, शेखाडी, दिवेआगर मार्गावर कोंडविल येथे दरवर्षी दरडी कोसळलल्याची घटना घडते . दरड कोसळल्यास वाहतूक बंद असल्याचा फटका हा स्थानिक व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होतो . हा मुख्य रस्ता दरडींमुळे बंद झाल्यास दिवेआगर - श्रीवर्धन किंवा इच्छित स्थळी जाण्यास सात ते आठ किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो . कोंडविल घाटात संभाव्य दरड कोसळण्याचा धोका पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने योग्य ते काळजी घेऊन पावसाळी होण्याच्या दुर्घटना टाळाव्या अशी मागणी प्रवाशी वर्ग करीत आहे .
Post a Comment