खेडोपाडयातील गरीब गरजु विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे हे दृष्टीलक्ष ठेवुन प.पु.डॉ.बापुजी साळुंखे यांनी म्हसळा सारख्या दुर्गम व डोंगराळ विभागात 50 वर्षांपूर्वी शिक्षण संस्था स्थापन केली.ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार अशी प्रेरणा घेऊन आलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे ज्ञान महर्षी प.पु.डॉ.बापुजी साळुंखे यांच्या जन्मदिन शताब्दी कार्यक्रम न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आयोजीत करण्यात आला होता. दिनांक 9 जुन 2018 या जन्म शताब्दी दिनी न्यु इंग्लिश स्कूल चे चेअरमन समीर बनकर यांचे हस्ते डॉ. बापुजी साळुंखे यांचे पुतळ्याचे पुजन कार्यक्रम करण्यात आले. दिनांक 10 जुन रोजी "ज्ञान ज्योत"शुभारंभ कार्यक्रम म्हसळा तालुका हिंदु समाज अध्यक्ष श्री सुभाष उर्फ बाळासाहेब करडे यांचे अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,तालुका प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते, तसेच पत्रकार अरुण जंगम व मुख्याध्यापक बी.एन.माळी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला.माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी डॉ.बापुजी साळुंखे यांचे पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण केले.प्राचार्य माळीसर यांनी ज्ञान ज्योत लावुन शाळा विध्यार्थी कु.प्रथमेश संभाजी बाबर या विद्यार्थ्याचे हातात सुपुर्त करून शहरात वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली.या वेळी उपस्थित विध्यार्थी आणि शिक्षकांनी डॉ.बापुजी साळुंखे यांच्या कार्याचा जयजयकार करून घोषणा दिल्या.प्राचार्य माळी यांनी शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्याची महती विषद करताना बापुजी साळुंखे यांनी दूरदृष्टीने रायगड जिल्ह्यात संस्थेच्या 406 शाखा स्थापण करीत वटवृक्षा सारखे शैक्षणिक जाळे तयार करून ठेवले आहे.या संस्थेत गरीबातील गरीब घटक शिक्षणाचा लाभ घेत आहे.या शाळांचा स्तुत्य कार्यभार आणि शैक्षणिक दर्जा पालकवर्गाच्या सहकार्याने उत्तम चालला आहे म्हणुनच शाळांत परीक्षा निकालात वाढ होत आहे असे सांगताना शिक्षण महर्षी डॉ.बापुजी साळुंखे यांचे प्रेरणेतून हे कार्य शक्य झाले आहे आता त्यांचा शैक्षणिक वारसा संस्था प्रमुख अभयकुमार साळुंखे हे नेटाने चालवीत आहेत म्हणुनच सन 2018-2019 हे संपुर्ण वर्ष डॉ.बापुजी साळुंखे यांचा जन्म शताब्दी वर्ष साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब करडे यांनी शाळेला सुट्टी असुनही डॉ.बापुजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी दिनी ज्ञान ज्योत घेण्यासाठी शाळेचे अनेक विध्यार्थी व शिक्षक उपस्थित आहेत ते आमच्यासह सर्व भाग्यवान असल्याचे सांगितले.शाळेसाठी आमचे सामाजीक व नागरिकाचे नात्याने नेहमी सहकार्य राहील असे वचन या वेळी देवुन आयोजीत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन श्री मंगेश कदम सर यांनी तर आभार श्री शिंदे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन सुर्यवंशी सर,संतोष जंगम यांनी केले होते.

Post a Comment