शिक्षण विभागाच्या ऑनलाईन धोरणामुळे टीसी ची सक्ती नाही...


म्हसळा : प्रतिनिधी
शिक्षण विभागाने आपले रेकार्ड ऑनलाईन व स्वतंत्र पोर्टल केल्याने शाळांमधील प्रवेशाची प्रक्रिया सुलभ राहणार आहे पालकांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला , तरी प्रवेश प्रक्रिया होऊ शकेल . शाळा सोडल्याचा दाखला शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाहिजेच असे नाही , मात्र त्याची कल्पना नसल्यामुळे पालक शाळांमध्ये खेटे घालत असतात . शासनाने राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थीचा संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड ऑनलाईन केला आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वेबसाईडवर स्टुडट पोर्टलवर अपलोड केला आहे राज्यातील प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेला पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक तपशील स्टुडंट पोर्टलवर अप - लोडकरणे अनिवार्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा बदलण्यासाठी जुन्या शाळेतून टीसी काढून दुसर्या शाळेत देण्याची आवश्यकता लागणार नाही . विद्यार्थ्याना ज्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे पालकाने फक्त अर्ज करायचा आहे . संबंधित शाळा विद्यार्थ्यांस  प्रवेश देण्यास तयार असेल , तर जुन्या शाळेकडे ट्रान्सफरची ऑनलाईन रिलेस्ट पाठविली जाते . सदर रिक्वेस्ट जुन्या शाळेला स्वीकृत करावीच लागते व विद्यार्याला नवीन शाळेत जोडले जाते . सात दिवसांत संबंधित रिक्वेस्ट शाळेने स्वीकृत न केल्यास गटशिक्षण अधिकार्यांना त्यांच्या लिंकवर रिक्वेस्ट दिसत असते . त्यामुळे गटशिक्षण अधिकार्यांच्या माध्यमातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला रिक्वेस्ट स्वीकारण्याबाबत निर्देश दिले जातात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई होऊ शकते . जरूर पडल्यास गटशिक्षण अधिकारी स्वतः ऑनलाईन ट्रान्सफरची प्रक्रिया पार पाडू शकतात या नवीन प्रक्रियेमुळे कोणत्याही शाळेत प्रवेश देण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांच्या टीसीची आवश्यकता लागत नाही . असे असतानाही पालक शाळांकडेटीसीचा आग्रह धरत आहेत . टीसी न दिल्यास संबंधित शिक्षण विभागाकडे तक्रार करीत आहेत . वास्तविक पाहता एखाद्या शाळेने विद्यार्थीला टीसी दिला व दुसऱ्या शाळेने तो विद्यार्थी स्वीकारला , तरी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर जुन्याच शाळेचा विद्यार्थी दिसेल . तो धड नवीन शाळेचा नसेल व जुन्याचा नसेल असे होऊ शकते . ही पूर्ण जबाबदारी जुन्या शाळेची असल्याने ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाचे निर्देश आहेत . 

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा आधिकार अधीनियम २००९ नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क असून नजीकच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेण्याचा प्रत्येक बालकास नैतिक अधिकार प्राप्त आहे . त्यामुळे कोणत्याही इयत्तेतील बालकास शाळा सोडण्याचा दाखला देण्यात न येणे अथवा रोखून धरणे योग्य नाही . त्याचबरोबर नवीन शाळेत प्रवेश घेताना पूर्वीप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे अनिवार्य अथवा सक्तीचे नाही . याबाबत शासन निर्णय आहे . 
– गजानन साळुंखे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी , पंचायत समिती म्हसळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा