सुशील यादव : म्हसळा
म्हसळा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास रस्ता हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे . दिघी पोर्टच्या वाहनांची या रस्त्यावर दुतर्फ बेकायदा पार्कग केली जाते . त्यामुळे वाहनचालकांना अरुंद मार्गावरुन जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत . म्हसळा शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सदर बायपास तयार केल्यानंतर दिघी पोर्टची अवजड वाहतूक या मार्गावरून सुरु झाली . सुरुवातीला ही वाहतूक कमी प्रमाणात होत होती ; परंतु २५ ते २७ टन वजनाच्या पोलादी कॉईल , कोळसा यांची वाहतूक करणारे ट्रेलर , मोठाले डंपर या मार्गावरुन वाहतूक करु लागले आहेत . परंतु या अवजड वाहनांचा व्याप वाढल्याने दिघी पोर्ट येथे ही वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडू लागली . त्यामुळे सदर वाहनचालकांनी त्यांची वाहने म्हसळा बायपास जेथून सुरु होतो त्या एच . पी . पेट्रोलपंपापासून जवळ जवळ ५०० मीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फ उभी करण्यास सुरुवात केली . दिवस - रात्र ही वाहने कायमस्वरुपी येथे उभी असतात . १० - १२ तासानंतर आपला नंबर आला की दिघी पोर्टकडे किंवा ज्या कंपनीत माल पोहचवायचा आहे तिकडे ती कूच करीत असतात . मात्र रस्त्याच्या दुतर्फ केल्या जाणाच्या अवजड वाहनांच्या पाकींगमुळे या बायपासचा वापर करणाच्या श्रीवर्धन , बोर्ली , बागमांडला , दिशेकडील प्रवासी वाहनांसह दिवेआगर , हरिहरेश्वर येथे जाणाच्या पर्यटकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो . आधीच दिघी ते माणगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे . यामध्ये म्हसळा बायपासचादेखील समावेश आहे . या मार्गावर गेल्या दोन तीन दिवसांपासून पडलेल्या पावसाने चिखल झाला असून , बायपासवर गेल्या दोन दिवसांत ८ - १० पर्यटकांच्या दुचाकी घसरुन किरकोळ अपघात झाले आहेत . कित्येक चारचाकी वाहनांवरील वाहकाचा ताबा सुटताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे त्यातच दुतर्फ लागलेल्या दिघी पोर्टच्या अवजड या किरकोळ घटनांचे मोठ्या अपघातांमध्ये रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही . त्यामुळे ही दिखी पोर्टची अवजड वाहने म्हसळा बायपासवरून हटवावी , अशी मागणी म्हसळा शहरातील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे .
म्हसळा बायपासवरुन प्रवास करताना पावसामुळे रस्त्यावरील चिखलाने अनेक दुचाकी , चारचाकी वाहन घसरुन अपघात होता होता बचावले आहेत . त्यातच दियी पोर्टच्या दुतर्फ लागलेल्या ट्रेलरमुळे या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे . एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी दिघी पोर्टची वाहने या बायपासवरुन त्वरीत हटवावी .
-सचिन करडे , अध्यक्ष , गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान , म्हसळा
रस्त्याच्या दुतफ पाकिंग करणाऱ्या दिघी पोर्टच्या वाहनचालकांना वाहने हटविण्यास सांगण्यात येईल व वारंवार वाहने पाकिंग करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई या करण्यात येईल .
- सुदर्शन गायकवाड सा . पोलीत निरीक्षक , म्हसळा
Post a Comment