म्हसळ्यात छत्री खरेदीला झुंबड : किमतीत २० % वाढ ; चायनापेक्षा मेड इन इंडियाला मागणी जास्त

प्रतिनिधी : म्हसळा
तालुक्यात पाऊस श्रावणातील सरींसारखा पडत असून काही युवक युवती पावसांत भिजत मनमुराद आनंद लुटत असले , तरी शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला पालक मात्र आपल्या कुटुंब व मुला मुलींसाठी छत्र्यांच्या दुकानात खरेदीत गर्क असल्याचे शहरातील बहुतांश दुकानांचे चित्र आहे शहरातील भाग्यलक्ष्मी क्लॉथ सेंटर , रमेश क्लॉथ सेंटर दुकानांत छत्री व रेनकोट खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती . या वर्ष छत्र्यांच्या दरात १५ - २० % ची वाढ झाली आहे थी - टू फोल्ड ते लांब दांड्याच्या रंगीबेरंगी विविध आकाराच्या निरनिराळ्या छत्र्या उपलब्ध आहेत . रु १५० ते ४०० पर्यंतच्या छत्र्यांना मागणी आहे . छोटया मुलांच्या व मुलींच्या छत्र्यांमध्ये व्हरायटी जास्त आहे . विविध रंगांच्या , कार्दैन , प्राण्यांची चित्रे असलेल्या छत्र्यांना जास्त प्रमाणात मागणी आहे . लेडीज छत्रीमध्ये सुद्धा अनेक प्रकार साईज , आहेत . त्यामध्ये तूफोल्ड , थ्री व फोर फोल्ड उपलब्ध आहेत . लेडीज छत्र्यांमध्ये जास्त व्हरायटी आसल्याने महिला वर्ग चोखंदळपणे खरेदी करतात पुरुषांसाठी काळी लांब दांड्याची व लाकडी लांब दांड्याची एवढाच चॉइस आहे . त्यामध्ये सप्तरंगी या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत . लहान मुलांची इलेस्टिक पट्टी असलेली व दांडा नसलेली सप्तरंगी छत्रीसुद्धा उपलब्ध आहे सध्या सर्वच ठिकाणी खरेदीची झुंबड सुरू आहे . 

म्हसळा बाजारात पावसाळी सीझनमध्ये सर्वच व्यापाऱ्यांची  छत्र्या रेनकोट विकण्यासाठी बर्यापैकी स्पर्धा आसल्याने सुरुवातीला छत्र्या कमी भावात मिळतात . त्यासाठी आम्ही सीझनच्या सुरुवातीला खरेदी करतो .
- बाळू करडे , ग्राहक 

बाजारांत या वर्षी चायना बॅन्ड छयांना मागणी कमी आहे चायना छत्र्यांचे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे अन्य ट्रैन्डपेक्षा लक्ष्मी ब्रँड छत्र्यांना मागणी आहे . ग्राहक मेड इन इंडियाकडे वळले आहेत . त्या टिकावू असतात म्हणून मागणी आहे.
- राहुलशेठ जैन , भाग्यलक्ष्मी क्लॉथ सेंटर 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा