श्रीवर्धन , बोर्लीपंचतनमध्ये पार्किग सुविधा हवी : बेकायदा पार्किंगमुळे वाहतुक कोंडीचे विघ्न ; पादचाऱ्यांना दररोजचा त्रास



दिघी : गणेश प्रभाळे 
श्रीवर्धन शहरात व बोर्लीपंचतन मध्ये बेशिस्त वाहनांच्या पाकींगमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत . अनेक महत्वाच्या रस्त्यांवरुन वाहनाना ये - जा करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे . याकडे तालुका प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी केली आहे . याबाबत नगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने पार्किंग संदर्भात कोणतेही ठोस नियोजन नसल्याने शहरवासीयांना रस्त्यावरून चालण्यास प्रचंड कसरत करावी लागते . त्यामुळे अशा बेशिस्त वाहतूकीमुळे अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . परंतु याकडे नगरपालिका प्रशासन कमालीचे दुर्लक्ष  करत असल्याने शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अशीच बेशिस्त पाकिंगमुळे महिलावर्ग आणि शाळेतील विद्यार्थी यांना ये - जा करण्यास अनेक समस्यांचा सामना करवा लागत आहे . श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौक ते बाजारपेठ तसेच बोर्लीपंचतनमध्ये बस स्थानक ते पोस्ट नाका या रहदारीच्या ठिकाणी मोटरसायकल व चारचाकी वाहने पाकिंग नसल्याने रस्त्यावरच उभे करण्यास नागरिक मजबूर आहेत . या उभ्या असलेल्या गाड्यांमुळे गावातून बाहेर आणि बाहेरून येणान्या मोटारसायकल व वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे एकतर पाकिंगला अडचण आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना हटविणे म्हणजे वादाला निमंत्रण देणे . विशेष म्हणजे दुकानासमोर वाहने लावली तर दुकानदारही वाहने लावू देत नाहीत.

पालिकेने पार्किंग व्यवस्था करून देणे बंधनकारक...
श्रीवर्धन शहर हे तालुक्यातच ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील खेडेगावाहून येणाच्या नागरीकांना वाहन लावण्याची गैरसोय होते . पार्किंग गैरसोय टाळण्यासाठी शहरातील असलेल्या मार्केटमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मार्केटमधील भागात ओपन स्पेसवर पार्किंग करण्याची व्यवस्था करून द्यावी . तसेच ठिकठिकाणी बेशिस्तपणे वाहने लावणार्यांना दंडात्मक कारवाई बजवावी जेणेकरून पुन्हा याच रस्त्यांवर दुचाकी वाहने लावतांना कोणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतील दुसरी गोष्ट , येथून पुढे शहरात नविन विविध संकुलने , घराच्या बांधकाम परवानगी देतांना पालिकेने पार्किंगची व्यवस्था करून देणे बंधनकारक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे .

स्त्यांवर बेशिस्त पाकिंग असल्यामुळे नागरिक त्रस्त...
श्रीवर्धन तालुक्यासह ग्रामीण भागातही वाहनांची संख्या वाढली आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील तरूण रोजंदारीसह इतर कामांसाठी शहराकडे धाव घेत आहेत दरम्यान सकाळी , दुपारी व सायंकाळी शाळकरी विद्याध्यनाही मुख्य रस्त्यावरून जाणे कठिण झाले आहे . वर्दळीच्या ठिकाणी तासन तास मालाचे ट्रक उभे करणे , बेकायदेशीर वाहनांचे थांबे तयार होणे . त्यामुळे शहरातील निम्मे रस्त्यांवर बेशिस्त पाकिंग असल्यामुळे नागरिक त्रस्त आहे . शिवाजी चौक , पोस्ट नाका , चौकात वाहनांच्या पाकिंगमुळे अनेक वेळा हाणामारीच्या घटनासुद्धा झालेल्या आहेत . याकडे पालिकेने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा