वडवली सत्संगतर्फे ज्येष्ठांचा सत्कार..

दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये साप्ताहिक सत्संग दरम्यान ज्येष्ठांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला . मंगळवारी संध्याकाळी साप्ताहिक सत्संगमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला . वडवली गावात गेल्या अनेक वर्षापासून संत निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. सतगुरुमाता सविंदर हरदेव यांच्या कृपेने गावात संत निरंकारी सत्संग भवनची भव्य वास्तू उभी राहिली . सत्संग भवनची इमारत उभारण्यासाठी अनेकांनी शारीरिक तसेच आर्थिक स्वरूपात मदत देऊ केली . त्यासाठी शारीरिक मेहनत घेतलेल्या अनेकांचा सत्कार यावेळी सत्संगमध्ये झाला . वयाच्या उत्तरेतर काळात भवन निर्मितीत व सदगुरुच्या सेवेत समर्पण भावनेने सेवा देणारे महात्मा सुरेश पेर , केन्या पेरवे गजानन नाकती , केऱ्या पेरवे , लक्ष्मण म्हात्रे , नथुराम धनावडे विजय नाक्ती तसेच भवन इमारतीसाठी जागा देणार्या सखुबाई नाक्ती , बांधकाम व्यवसायिक महात्मा संतोष धुमाळ वडवली सेवादल युनिट चे सेवादल अधिकारी व शालेय परीक्षांत विशेष गुण संपादन करणाच्या यशस्वी विद्यायचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला . सत्संग चे सूत्रसंचालन मुखी महात्मा गणेश नाक्ती यांनी केले गेली अनेक वर्षे हे सर्व ज्येष्ठ संतजन सदगुरु सेवेत तन - मन व धनाने सेवा अर्पण केली असे गौरवोद्रार मुखीं महात्मा नाक्ति यांनी व्यक्त केले . वडवली सत्संग भवनच्या प्रशस्त इमारतीवर आणखी एक मजला बांधण्यात आला . त्याचे उद्घाटनदेखील ज्येष्ठ महात्माच्या शुभ हस्ते करण्यात आले . सत्संगमध्ये लॅपटॉप , प्रोजेक्टर , प्रिंटर इंटरनेट अशा डिजिटलायझेशनची साधने उपलब्ध झाली आहेत . याद्वारे सद्गुरु सविंदर माताजींचे समागम लाईव्ह पाहू शकण्याची सोय झाली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा