श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
छत्रपती शिवरायांच्या तिथी प्रमाणे येणाऱ्या राज्यभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिवभक्त रायगडा कडे निघाले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील शहर व विविध गावातून शिवभक्तांचे थवे मोठया जल्लोषात भगवा ध्वज फडकवत रायगडा कडे मार्गक्रमण करत आहेत. एक महिना अगोदर पासून शिवराज्याभिषेकाची तयारी गाव पातळीवर केली जाते .स्थानिक सेवा भावी संस्था व तरुणांचे विविध संघ नियोजन पुर्ण रायगडी हजर होतात .या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे मात्र शिवभक्तांचा उत्साह त्यामुळे द्विगुणी झाल्याचे दिसून येते. आज सकाळ पासून विविध भागांतील तरुण पारंपरिक वेशभूषा करून राजगडी दाखल होण्यासाठी सज्ज झाले होते. शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक रायगड वर सादर करण्यासाठी श्रीवर्ध मधील तरुण अनेक महिने अगोदर पासून सराव करत आहेत. त्यामुळे उद्या राज्यभिषेक सोहळयाच्या मंगल प्रसंगी तलवार ,दांडपट्टा, भाला, यांचे वेगवेगळे हात सादर केले जाणार आहेत. शिवकालीन युद्ध कलेचे जतन करून श्रीवर्धन मधील तरुणांनी एक आदर्शवत काम केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यास लहान मुले, तरुण ,तरुणी ,अबाल वृद्ध सर्व मोठया संख्येने हजर असतात .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चा आदर व प्रेमाने आज रायगड ची भुमी हर्षउल्हसित झाल्याची दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत .आम्ही प्रत्येक वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला जातो. ऊन वारा व पाऊस याची तमा आम्ही कधीच बाळगत नाहीत .
- राजू भोसले (शिवभक्त श्रीवर्धन )

Post a Comment