- म्हसळा : प्रतिनिधी
- दिघी पोर्टमधून वाहतूक करणरेट्रेलर निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेकदा मोठ्या प्रमाणावर अपघात होतात . या अपघातात महादेव नाकती यांचे उद्ध्वस्त झाले असून हे अपघात न थांबल्यास दिघी पोर्टविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे . दरम्यान , नाकती यांना मदत करण्यासाठी शिवसेना धावून आली आहे . दिघी पोर्टमधून वाहतूक करणार्या ट्रेलरचालकांना शिस्त नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो . याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून वाढत्या अपघातांना आळा न बसल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा युवासेनेचे पदाधिकारी महेश पाटील यांनी दिले . काही दिवसांपूर्वी खरसाई गावात झालेल्या अपघातात महादेव नाकती यांचे घर उद्ध्वस्त झाले . नाकती कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी रायगड जिल्ह्यप्रमुख रवी मुंढे , तालुकाप्रमुख नंदूशिर्के , श्रीवर्धन क्षेत्र संघटक रवींद्र लाड , अनंत कांबळे , सरपंच महादेव कांबळे आदींनी पुढाकार घेतला आहे . यावेळी बाळा म्हात्रे , मुकेश पवार संदीप डोंगरे , अमित म्हामूणकर , बाबू शिर्के , प्रवेश काजारे , अक्रम साने , विशाल सायकर , प्रसन्ना निजामपूरकर , किरण पारेख , रोहित पवार जय मोहिते , अजय पैरवी , सुजित बोरकर आदी उपस्थित होते .

Post a Comment