म्हसळा येथील पत्रकार अरुण जंगम यांना बंधुशोक


प्रतिनिधी 

म्हसळा येथील पत्रकार अरुण जंगम यांचे छोटे बंधू अमित जंगम यांचे वयाच्या चौतीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

अरुण जंगम यांचे छोटे बंधू अमित जंगम यांना शनिवारी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास छाती दुखू लागल्याने त्यांना म्हसळा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते.आज सकाळी त्यांना मुंबई येथे अधिक तपासणीसाठी नेण्यात येणार होते.मात्र काळाने काल रात्री च्या सुमारास परत त्याच्या निवासस्थानी ह्र्दयविकाराचा तीव्र झटका आला.त्यातच त्यांचे निधन झाले. 

गेल्या वर्षी अरुण जंगम यांचे बंधू पत्रकार अमोल जंगम यांचे सुद्धा  ह्र्दयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले होते. 

अमित जंगम यांच्या पश्चात वडील,आई, भाऊ,पत्नी,आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा