प्रतिनिधी,
मागील काही वर्षात पावसाळी सहलीदरम्यान अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यात काहींना आपले प्राणी गमवावे लागले आहेत . या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी सहलीतील दुर्घटना टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे अतिउत्साही पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी पर्यटनस्थळांवर पोलीस उत्पादन शुल्क व महसूल विभाग संयुक्तरीत्या गरत घालणार आहेत . पावसाळी सहलीच्या वेळी पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा दुर्घटनांना सामोरे जावे लागते आणि उत्साहावर विरजण पडते . गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या तब्बल १६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता . त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी , असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फ करण्यात आलं आहे रायगड जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे ऐतिहासिक स्थळे आहेत . धार्मिक स्थळे आहेत . त्यामुळे हा जिल्हा पर्यटकांचा फेव्हरीट आहे त्याचबरोबर येथे धबधबे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करतात त्यामुळे वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात येतात . मनसोक्त भिजत इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात . अतिउत्साही पर्यटक वर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत मद्यपान करणार्या किंवा विक्री करणार्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस , उत्पादन शुल्क महसूल विभागांना संयुक्तरीत्या गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . ट्रेकिंगला जाणार्यांना आता वनविभागाकडे नावनोंदणी करावी लागणार आहे. कर्जतमधील अषणे - कोषाणे , सोलनपाडा , मुरूडमधील खारअंबोली , फणसाड धरण , माणगावचा देवकुंड धबधबा , खोपोलीचा झेनीथ धबधबा , महाडमधील मांडला , अलिबागजवळचा सिद्धेश्वर , तीनविरा धरण , पोलादपूरचा झुलता पूल , मोरझोतचा धबधब ही रायगड जिल्ह्यातील पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत . पावसाळ्याच्या दिवसात शनिवार रविवारी येथे पर्यटकांची गर्दी असते . येथे जाताना पर्यटकांनी काळजी घ्यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फ करण्यात आले आहे
पर्यटकांनो , या रायगडमध्ये आपले स्वागत आहे , परंतु इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना काळजी घ्या . जीव धोक्यात येईल , असे कुठलेही धाडस करू नका . मद्यपान करून पाण्यात उतरण्याचे टाळा .
- अभय यावलकर , प्रभारी जिल्हाधिकारी , रायगड

Post a Comment