कोळे केलटे परिसरात वीजेचा लपंडाव सुरुच...

प्रतिनिधी,
म्हसळा तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात करत गरमीपासून दिलासा दिला . मात्र , दुसरीकडे वीज - वितरणचा भोंगळ कारभार पुढे आला आहे म्हसळा  तालुक्यातील केलटे , कोळे परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने त्या परिसरातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकदा का दिवसा वीज गेली की , ती दुसर्या दिवशी येते , अन्यथा दोन - तीन दिवस गायब असते . वीज तारांवर झाड पडणे , झुंबर जाणे , तारा तुटणे अशा अनेक कारणांमुळे या परिसरातील वीज जात असल्याची माहिती वीज अधिकारी जनतेला देत आहेत ; परंतु पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी करावयाची कामे  करण्याच्या नावाने वीज घालविण्यात येत होती . मात्र , त्याने फारसा काही फरक पडलेला दिसत नाही . विशेषत : ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . रात्रीच्या वेळी वीज गेली तर , रात्र जागूनच काढावी लागत आहे ही परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत . याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता , या भागाला श्रीवर्धनमधून वीज देण्यात आली आहे त्यामुळे तिकडे काही अडचण आली की वीजपुरवठा खंडीत होतो , असे उत्तर देण्यात येते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा