श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यामध्ये भिलजे ’ माशांचा हंगाम सुरु झाला असून , सध्या मोठ्या प्रमाणात हे मासे मिळत आहेत . स्थानिक ग्राहकांसह गोवा , पुणे व मुंबई येथे या माशाच्या खवय्यांची संख्या लक्षणीय आहे हे मासे खाण्यास चविष्ट लागत असल्याने त्याचप्रमाणे मद्याबरोबर चकणा म्हणून त्यांचा उपयोग केला जातो . ठराविक हंगामातच हे मासे मिळत असल्याने सध्या त्यांना चांगली मागणी आहे .
श्रीवर्धन तालुक्यातील ठराविक गावातील मच्छिमार हे मासे पकडण्यासाठी जात असतात हे मासे पकडण्यासाठी लागणारी जाळी तयार करण्यासाठी बरेच दिवस लागतात . शिवाय हे मासे पकडण्यासाठी पहाटे चार ते पाच वाजण्याच्यादरम्यान समुद्रामध्ये मच्छिमार जात असतात . ही मासे पकडण्याची जाळी इतकी लहान व नाजुक असते की त्याला एखादी जड वस्तू लागली अथवा पाण्याचा वेग वाढला तरी ती फाटण्याची दाट शक्यता असते . त्यामुळे मच्छिमार ह्या जाळीची खूप काळजी घेत असतात . हे मासे पकडून आणल्यानंतर ते मासे जाळसकट समुद्राच्या किनाच्यावर घेऊन आल्यावर ती जाळी चार ते पाच मच्छिमार एकत्र येऊन हलविण्यात येते आणि त्यामधील मासे काढले जातात . हे भिलजे मासे दिसायला पांढरे शुभ्र व खायला चविष्ट असल्याने हे मासे सर्वांना आवडणारे व कमी पैशांमध्ये मिळत असल्याने खवय्ये या माशांना लगेच पसंती करून खरेदी करीत असतात . त्याचप्रमाणे व्यापारी लोक हे मासे खरेदी करून ती मासे गोवा , पुणा , मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्या ठिकाणी बर्फमध्ये साठवुन त्याच निर्यात करतात . सध्या श्रीवर्धनमध्ये हे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असले , तरी व्यापार्यांकडून भाव कमी दिला जात असल्याने मच्छिमारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे

Post a Comment