● आंबेत खाडीपट्ट्यात खा.तटकरेंच्या हस्ते अनेक विकासकामांचे उदघाटन वभूमिपूजन
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यात आता महाविकास आघडीचे सरकार असल्याने आता जास्तीत जास्त विकास निधी आणून अधिकाधिक गतिमान पद्धतीने विकास कामे होतील असे प्रतिपादन माजी मंत्री तथा खासदार सुनिल तटकरे यांनी आंबेत विभागातील विविध विकासकामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना केले आहे. सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्याची निर्मिती केली हाच आदर्श मानुन आणि राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व जाती धर्मातील लोकांना समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात सहकारी मंत्र्यांना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजनांतून करोडो रुपयांची विकासकामे केली आहेत याचा आनंद व अभिमान आहे असे सांगून मागील पाच वर्षात सुद्धा केंद्रात व राज्यात सत्ता नसताना देखील युती सरकार मधील मंत्र्यांकडून करोडो रुपयांचा विकास निधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो असल्याचे सांगून जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे असा विश्वास व्यक्त केला. आंबेत हे आपल्या बॅ.अंतुले साहेबांचे गाव असल्याने याठिकाणी अधिकाधिक विकास निश्चितच आपण करणार असून बॅ.अंतुले साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरं तिसर कोणी नसून आपण त्यांच्या उर्वरित स्वप्नांना पूर्ण करणार असल्याची ग्वाही सुद्धा तटकरे यांनी यावेळी उपस्थित समूहाला दिली. महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाईल त्यामुळे आमच्या विरोधात असलेल्यांनी सुद्धा उगीच कुठेतरी नाक खुपसू नये असा टोला निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्या कार्यकर्त्यांना तटकरे यांनी लगावला तसेच खाडीपट्टा हा आता विकास काम करणाऱ्या लोकनेत्याला निश्चितपणे पाठिंबा देईल यात काडीमात्र शंका उरणार नाही असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
रायगड रत्नागिरी लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आंबेत खाडीपट्टा विभागातील आंबेत नविवाडी, संदेरी, गडदाव, मरियम खारगाव, लिपणी वावे, मठाचीवाडी या गावातील अंतर्गत रस्ते, एसटी पीक अप शेड, स्मशान शेड उदघाटन, अंगणवाडी, साठवण टाकी, विद्युत पोळ दुरुस्ती, सभामंडप उदघाटन अशा अनेक विकास कामांच्या उदघाटन व भूमीपूजनाचा समारंभ रविवारी पार पडला. यावेळी गावंतर्गत रस्ते, विजेचे पोळ, स्मशानभूमी, पाण्याची साठवण टाकी, अशा अनेक विकासकामांची पूर्तता झाल्यानंतर खासदार तटकरे यांनी आंबेत खाडीपट्टा विभागात पुन्हा एकदा विकासकामांचा धडाका लावला आहे. माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुलेच्या कारकिर्दीत झालेल्या अंतर्गत रस्ते बांधणीला खासदार तटकरे यांनी नवी चकाकी आणल्यानंतर त्यांच्या कामाची आंबेत विभागातून स्तुती करण्यात येत आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे, प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली, जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नाझीम हसावरे, उपसभापती मधुकर गायकर, मुंबई कमिटी कार्याध्यक्ष जयंत चिबडे, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, गण अध्यक्ष जयवंत सावंत, सरपंच अंकुश खडस, सरपंच दगडू डांगे, म.या.चॅरिटी ट्रस्ट म्हसळा अध्यक्ष शांताराम गायकर, माजी जिप सदस्या वैशाली सावंत, जेष्ठ नेते व्यंकटेश सावंत, यांसह मुंबई व ग्रामीण कमिटी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment