म्हसळा : संजय खांबेटे
म्हसळा - श्रीवर्धन तालुक्यात औद्योगिक
वसाहत करण्यापेक्षा अन्य मार्गानेशासनाने व्यवसाय विकसित करावे , अशी धारणा सर्वसामान्य जनतेची आहे. दिघी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर विकसित झाले असतानाच त्याचा दोनही तालुक्यातील स्थानिक जनतेचा अर्थिक विकास होण्यासाठी कोणताही विशेष फायदा होत नसल्याची धारणा स्थनिकांच्यात आहे. या परिसरातील नागरी रस्त्यांचा वापर दिघी पोर्ट लि . आपल्या व्यापारी व अवजड वाहतूकीसाठी करीत असल्याने नव्याने पुणे - दिशी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित आहे . त्यामधील माणगांव ते म्हसळा या पहील्या टप्प्याचे काम सुरू केले आहे या रस्त्याचा फायदा श्रीवर्धन - मुरूड व म्हसळा या तीनही तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला नक्कीच होणार आहे श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात प्रकल्प राबविताना अर्थिक विकासाचे बरोबरीने शाश्वत विकासात वाढ करण्यासाठी प्रकल्प राबविणे महत्त्वाचे असताना दिघी पोर्ट लि . ने त्याच विषयाला बगल दिली आहे. विकास शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे अनेक दृष्टीकोनातून घेतला जातो . सर्वसाधारणपणे विकासाचा अर्थ अर्थिक संपन्नता व सुखसोयींची उपलब्धता असा घेतला जातो ; परंतु पर्यावरणशास्त्रानुसार विकास म्हणजे सर्व सजीवांचे कल्याण होय . यामध्ये लोकसंख्येचा गुणात्मक विकास म्हणजेच ज्या विकासामुळे सुसंस्कृत , देशप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या संख्येत वाढ होणे त्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन , संरक्षण व भावी पिढ्यांचा विचार केला जातो . शाश्वत विकासाची आज गरज आहे . शाश्वत विकासाची संकल्पना सर्व समावेशक आहे , त्यामध्ये सर्वच सजीवांच्या कल्याणाचा व विकासाचा विचार करताना पर्यावरण व पर्यावरणाचे सरंक्षण याची अधिक व्यापक भूमिका आहे. दिघीपोर्ट लि . च्या व्यापक विस्तारात केवळ अर्थिक विकासच आहे तोसुद्धा केवळ कंपनी व शासन यांच्यात सीमीत आहे . आपण करीत असलेल्या व्याप्तचे पर्यावरणावर काय परिणाम होतील याचा दिघी पोर्ट लि. ने आणि केंद्र व राज्याचे पर्यावरण विभागाने कोणताही अभ्यास केला नसल्याचे अगर त्याबाबत अद्याप काही करत असल्याचे दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशाच पद्धतीच्या तक्र री म्हसळा तालुक्यातील तुर्बाडी येथे होत असलेल्या जहाज बांधणी व दुरुस्तीचे प्रकल्पाला आहे . दास ऑफ शोअर कंपनीने सी . आर झेड व पर्यावरण अधिनियम १९८६ च्या नियमांचे उल्लघंन के ल्याची तक्रार आहे . रोहिणी व आडी ठाकूरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्याबाबत तक्रारी केल्याच्या नोंदी आहेत .
श्रीवर्धन - म्हसळ्यासह कोकण किनारपट्टीलगत केवळ विकासाच्या नावाखाली सुरू असणाच्या या कपन्यासह सर्वच कंपन्या आर्थिक शाश्वततेचा एक उत्तम निर्देशांक म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते . याच्याकडे लक्ष केंद्रीत करताना पर्यावरणीय शाश्वततेबाबत व हवामानातील असमानतेबाबत प्रकल्प राबवित असलेल्या भागांचा विचार करणे आवश्यक आहे . पर्यावरण आणि आर्थिक विकास याचा अंतरसंबंध आहे पर्यावरण नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विकास म्हणजेच म्हणजे वस्तु व सेवाचे उत्पादनात वाढ होणे . याच अनुषंगाने त्या - त्या विभागात असणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या विपुलतेत दिघी पोर्ट लि . दास ऑफ शोअर कंपनीने वाढ करणे आवश्यक आहे . त्याउलट अशा पद्धतीच्या प्रकल्पांमुळे श्रीवर्धन - म्हसळा - मुरुड तालुक्यातील शेती , बागायती उत्पन्नावर थोडा बहुत परिणाम झाला असल्याचे शेतकयांच्या चर्चेतून आढळते . दिघी पोर्ट लि , सुमारे १६०० एकरचा परिसर विकसित केला असून करताना अनेक भौगोलिक स्थित्यंतरे झाली असण्याचा
संभव आहे. त्याचबरोबरीने ४० ते ४५ फूट खोल बंदराची निर्मिती करण्यात आली आहे त्याचा दृश्यपरिणाम समुद्राच्या अन्य परिसरांत पर्यायाने अन्य ठिकाणी होऊ शकतो . भारतीय समुद्र किनारपट्टी दर दशकाप्रति १ सेंमी . ने वाढत असल्याची नोंद आहे भारतीय समुद्र पातळी २०५० पर्यंत ३५ ते ४० सें मीने वाढण्याची शक्यता तज्ज्ञानी व्यक्त केली आहे .श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील नैसर्गिक विपुलता , समुद्रकिनारा या दृष्टीने पर्यटन विकास आराखडा निश्चित होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने पुणे , मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील व्यवसायिकांनी बहुतांश जागा घेतल्या आहेत. त्या दृष्टीने व्यापक विकास व्हावा , अशी अपेक्षा गुंतवणूकदार व स्थानिकांची आहे.
श्रीवर्धन परिसरातील महत्वाच्या पर्यटन स्थळांत दिवेआगरला ' श्री सुवर्णगणेश मंदिरामुळे पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला आहे नारळ - सुपारीच्या बागा व कौलारू घरे व टुमदार बंगले , रिसॉर्ट याचा पर्यटक मनमुराद आनंद लुटतात त्याचबरोबर दक्षिण रायगडच्या शेवटचा तालुका श्रीवर्धन शहरांतील सोमजाईदेवी मंदिर , लक्ष्मी नारायण मंदिर , अतिशय सुंदर असा श्रीवर्धनचा लांबसडक समुद्र किनारा दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्रहरी हरेश्वर , कोलमांडला , बागमांडला पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट वेळास , केळशी , आंजर्ले असूद ( मुरुड ) ही सर्वच ठकाण पर्यटनस्थळे आहेत..
Post a Comment