श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन शहरातील नगरपरिषदेच्या पर्यटन पूरक भूमिकेमुळे पर्यटनात आमुलाग्र वाढ झालेली आहे मात्र शहरातील पेशवेकालीन पर्यटन स्थळे दुर्लक्षित असलेले निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्राचीन व ऐतिहासिक ठेव्या पासुन पर्यटक वंचित राहत आहेत असे निदर्शनास येते .
श्रीवर्धन शहर हे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्म गाव आहे. या ऐतिहासिक शहराला निसर्ग दत्त सौंदर्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. फेसळणार समुद्र व नारळ सुपारीच्या बागा मानवी मनाला अविस्मरणीय आनंद देऊन जातात त्या कारणे महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक श्रीवर्धन भेटी साठी नियमित येतात .
श्रीवर्धन नगरपरिषदेने पर्यटक निधीच्या स्वरूपात रुपये
2लाख 34 हजार 285 आज पर्यंत कमावली आहेत .पेशव्यां काळात श्रीवर्धन तालुक्यात विविध मंदिराचे सुबक व आकर्षक बांधकाम करण्यात आले .श्रीवर्धन शहराच्या पश्चिमेस असलेले जीवनेश्वर चे मंदिर त्याचे प्रतीक आहे . जीवनेश्वर मंदिर श्रीवर्धन शहराच्या पश्चिम दिशेला 1 किमी अंतरावर वसलेले आहे . सुमारे सतराव्या शतकात आजच्या जीवना बंदराच्या शेजारील दोन एकर शेती च्या परिसरात स्थानिकांना स्वयंभु शिवलिंग दृष्टीस पडले .त्या नंतर त्याच जागेवर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . पेशव्यांनी मंदिराची उभारणी केली . मंदिर प्राचीन असून जुन्या वास्तू कलेचा अप्रतिम नमुना आहे . मंदिराच्या बांधणीत सागवान लाकडाचा सर्वत्र वापर केला आहे .परंतु आजमितीस जीवनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.नगरपरिषने केलेल्या पर्यटन पूरक नवं वास्तू पेक्षा प्राचीन व ऐतिहासिक ठेवा निश्चितच पर्यटन व्यवसाया साठी लाभदायक ठरू शकतो. त्या दृष्टीने नगरपरिषदेने प्रयत्न करणे अगत्याचे आहे .
आजमितीस जीवनेश्वर मंदिराच्या आतील भिंती काही प्रमाणात खचलेल्या निदर्शनास येत आहेत .पावसाच्या पाण्याचा ओलावा लागत असल्याचे निदर्शनास येते आहे .मंदिर परिसराला संरक्षक भिंतीची नितांत आवश्यकता आहे .पर्यटक व भाविक यांच्या साठी मुबलक शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आजमितीस पेयजला साठी एकमेव पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे.मंदिर परिसरात आलेल्या जुन्या बारावात अस्वच्छ पाणी साचले आहे .मंदिर परिसर मोठा असून चांगल्या पद्धतीने रोपवाटिकेचे नियोजन केल्यास मंदिर परिसर आकर्षक बनेल .तसेच पर्यटकांच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे .त्या दृष्टीने श्रीवर्धन नगरपरिषदेने काम करणे गरजेचे आहे. मंदिराच्या लगत च नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून पर्यटन वास्तू ची निर्मिती केली आहे .मात्र पर्यटक क्वचितच तिकडे फिरकताना निदर्शनास येतात .श्रीवर्धन नगरपरिषद अद्याप पर्यटन निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालेली नाही .
श्रीवर्धन शहरात पर्यटन व्यवसाय भरारी घेत आहे .हॉटेल व लॉजिग जोर पकड आहे . ऐतिहासिक वास्तू यांची निगा राखल्यास निश्चितच पर्यटन विकासात आमुलाग्र बद्दल शक्य आहे .जीवनेश्वर शिवमंदिरा च्या जीर्णोद्धारा ची मागणी जनते कडून जोर पकड आहे असे निदर्शनास येत आहे .
------------------------------------------
जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार संबधी कुठलीही मागणी प्राप्त झालेली नाही .मागणी झाल्यास त्या विषयी ठराव घेऊन निश्चितच सकारात्मक भूमिका घेतली जाईल .पर्यटन वाढीसाठी नगरपरिषद सदैव तत्पर आहे .
-अर्चना दिवे (मुख्यधिकारी नगरपरिषद श्रीवर्धन )
--------------------------------------
जीवनेश्वर चे मंदिर पांडवकालीन आहे .श्रीवर्धन मध्ये येणाऱ्या पर्यटकांना सदर मंदिरा विषयी योग्य माहिती उपलब्ध करून दिल्यास निश्चित पर्यटन विकासासाठी फायदा होईल . मंदिराची देखभाल विश्वस्त करतात .नगरपरिषदे कडे मदत ची मागणी झाल्यास निश्चितच त्या अनुषंगाने प्रयत्न करू .
-वसंत यादव ( पर्यटन सभापती श्रीवर्धन नगरपरिषद )
-------------------------------------------
जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज आहे .मंदिराच्या आतील भिंती काही प्रमाणात खचत चालल्या आहेत .नगरपरिषदेने अद्याय कोणतीच मदत केलेले नाही .मंदिराला संरक्षण भिंतीची गरज आहे .श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते .
-जनार्धन पांडुरंग गुरव ( विश्वस्त जीवनेश्वर मंदिर )
------------------------------------------
पर्यटनाच्या दृष्टीने जीवनेश्वर महत्वाचे आहे .त्याच्या जीर्णोद्धारा साठी आमदार सुनील तटकरे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न करू .श्रीवर्धन नगरपरिषद पर्यटकांसाठी सदैव सकारात्मक काम करत आहे त्यामुळे आज पर्यटकांच्या संख्येत आमुलाग्र वाढ झाली आहे .
-नरेंद्र भुसाने (नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद )
--------------------------------------------
श्रीवर्धन मध्ये आजमितीस पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे त्या दृष्टीने ऐतिहासिक पर्यटन स्थळे महत्वाचे आहेत .जीवनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी योग्य ती मदत केली जाईल .श्रीवर्धन मधील जनतेच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल
- अवधूत तटकरे ( विधानसभा आमदार श्रीवर्धन )
Post a Comment