म्हसळा : संजय खांबेटे
म्हसळा तालुका येथे महसूल विभागाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत हा विचार १९९५ साली नाशिक येथे राज्यातील आयुक्तांच्या सभेपुढे आला . आज तब्बल २३ वर्षे होऊनही म्हसळा तालुका प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव केवळ कागदावरच असल्याची चर्चा आहे म्हसळा तालुक्यातील अत्यंत मध्यवर्ती असलेली प्रशासकीय इमारत ८० वर्षांची जुनी झाली आहे. सद्यस्थितीत या इमारतीत तहसील कार्यालय , पोलीस स्टेशन , परीक्षेत्र वन कार्यालय , उपकोषागार व सेतु अशी कार्यालये आहेत . जुनी इमारत नागरिकांची वाढलेली प्रशासकीय कामे यामुळे कार्यालयांची रचना अत्यंत दाटीची झाली आहे . म्हसळा प्रशासकीय इमारतीची अस्तित्वात असणारी जागा उंच - सखल असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्किटेक्ट नेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन अतिशय सुंदर - देखणी इमारत त्याच्याच नरेतून पूर्ण व्हावी अशी अभ्यासू कल्पना तत्कालीन पालकमंत्री आमदार सुनील तटकरे यांची होती , त्याकाळी आर्किटेक्टनेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करुनही पुढे मात्र शून्य अशी आजपर्यंत परीस्थिती आहे , या बाबत स्थानिक बांधकाम विभागही दुर्लक्ष करीत आहे. नवीन प्रशासकीयं इमारतीचा प्रस्ताव अद्यापही लालफितीतच अडकला आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आवश्यकता ओळखून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातील माणगाव , श्रवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यातून प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून पाठपुरावा केला. माणगाव श्रीवर्धन येथे इमारती झाल्या , म्हसळ्याचा प्रस्ताव अद्दपही गुलदस्त्यात आहे . तो ना शासकीय राजकीय मंडळींकडून पुढे जात नाही ही परीस्थिती आहे.
प्रशासकीय इमारतीसाठी महसूल विभागाच्या अखत्यारीतील गावठण नं . १ / १६५ अ मध्ये सुमारे १७ हजार ३०० चौ . फूट जागा आहे . त्यामध्ये तहसील कार्यालय , पोलीस ठाणे , परीक्षेत्र वन कार्यालय , उपकोषागार दुय्यम निबंधक , सार्वजनिक बांधकाम वैिभाग , सामाजिक वनीकरण , सहकारी अधिकारी - सहकारी संस्था , महिला विश्रांती कक्ष , उपहारगृह , सभागृह , पाकींग , फ्लॅग पोष्ट , पर्जन्यमापक यंत्र व स्त्री - पुरुष स्वतंत्र प्रसाधन गृह असे प्रस्तावित आहे . दुय्यम निबंधक कार्यालयासाठी स्वतंत्र जागा घेण्यात आली आहे व परीक्षेत्र वन अधिकारी स्वतंत्र जागेच्या शोधात आहेत, तर म्हसळा एसटी स्टण्डच्या समोर असणाऱ्या पोलीस निवासस्थानी बांधा व वापरा या तत्वावर पोलीस स्टेशन व निवासस्थाने उभारावी शासनाचा कोणताही निधी न वापरता अत्यंत सुसज्ज पोलीस स्टेशन उभारता येईल असा प्रस्ताव आहे. तहसील ऑफीसच्या जागेत खाली पाकींग , हॉटेल अशा पद्धतीने सोय करुन तीन मजली इमारत बांधल्यास अत्यंत सुटसुटीत कार्यालये होऊ शकतील असे जाणकारांचे मत आहे. यामध्ये तहसील कार्यालय पोलीस ठाणे , परीक्षेत्र वन कार्यालय, उपकोषागार यांना प्रत्येकी १००० १५०० चौ . फुट क्षेत्राची जागा लागणार आहे अस्तित्वात असणार्या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट व देखणी इमारत होण्यासाठी राज्याचे मुख्य वास्तु शास्त्रज्ञांनी ( आर्केटेक्ट ) २०१० ला म्हसळ्याला प्रत्यक्ष भेट दिली होती त्या अनुषंगाने त्यावेळी इमारतीला सुमारे पाच कोटीचे ढोबळ अंदाजपत्रक शासनाकडे सादर केले होते . आता त्याच इमारतीला नऊ १० कोटी खर्च अपेक्षीत आहे.
१ ) म्हसळा तालुक्यात असणारी ही प्रशासकीय इमारत जंजिरा संस्थानच्या काळात बांधली आहे जंजिरा संस्थानच्या नवाबाने १९३६-३७ ला ही इमारत बांधली असे जुनीजाणती मंडळी सांगतात , त्या काळी दूरदृष्टीने बांधलेली ही इमारत केवळ ४२ - ४५ हजारांत बांधली होती असेही सांगितले . शासनाने तिची देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम संपवली . प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव नव्याने मंजूर करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार का घेत नाही , असा प्रश्न पडला आहे.
२) फार पूर्वी इमारतीच्या खालच्या बाजुला कार्यालये व वरती स्टोअर अशी सुरुवातीला रचना होती . आता मात्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संजय गांधी निराधार योजना , पुरवठा , निवडणूक , सेतू , अप्पर तहसीलदार कुळवहीवाट असे विविध विभाग असल्याने वर्दळ जास्त झाल्यावर अनेकवेळा हा भाग हालतो . या मजल्यावर जाणारा जीनासुद्धा असुरक्षित आहे
३ ) इमारतीचा वरचा भाग कधीही पडू शकेल इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट होणे जरुरीचे आहे...
Post a Comment