श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन नगरपरिषदेने काही वर्षांपूर्वी डंपिंग ग्राऊंडसाठी आरक्षित केलेल्या जागेवर कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्लांट सुरु केला आहे पण त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत . या डंपिंग ग्राऊंड परिसरात श्रीवर्धन चौकर पाखाडी येथे राहणाऱ्या स्वाती जोशी यांच्या मालकीची शेती आहे त्यांच्या शेतामध्ये गोड्या पाण्याची चांगली विहीर होती . परंतु डंपिंग ग्राऊंडच्या कचऱ्याची दुर्गधी व मैला यामुळे त्यांच्या विहिरीचे पाणी काळ्या रंगाचे झाले असून पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत आहे . तसेच शेतामध्येही दुर्गंधीयुक्त पाणी शिरुन नांगरणी करणे कठीण होऊन बसले आहे हे डंपिंग ग्राऊंड श्रीवर्धन वाळवटी रोडवर उजव्या हाताला आहे या डंपिंग ग्राऊंडपासून जवळच श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील गायगोठण व श्रीवर्धन कोंड ह्या दोन नागरीवस्त्या आहेत . डंपिंग ग्राऊंडला या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता . अनेक वेळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदने दिली . मंत्र्यांनासुध्दा निवेदने देण्यात आली होती . मोर्चा , धरणे आंदोलन सर्व प्रकार करूनही नगरपरिषदेने त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड उभारलेच . शेवटी या परिसरातील नागरिकांनी डंपिंग ग्राऊंड हटविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. जोशी हेसुध्दा त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत . या डंपिंग ग्राऊंड जवळच जनार्दन उपाध्ये यांचे घर आहे . हळूहळू डंपिंग ग्राऊंडमधील दूषित पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसण्याची शक्यता आहे तसेच जवळच्या नागरी वस्त्यामधील विहिरी दूषित होण्याची शक्यता आहे त्याठिकाणी उभारण्यात आलेला कचच्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प संथ गतीने सुरु असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे खतनिर्मिती योग्य कचरा वापरल्यानंतर उरलेला कचरा तेथेच पडून असल्यामुळे दूषित पाणी तयार होत आहे तरी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने सदरचा कचरा त्या ठिकाणाहून तातडीने हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे .

Post a Comment