श्रीवर्धन - भारत चोगले
श्रीवर्धन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी श्रीवर्धन नगरपरिषद शिक्षण मंडळाची शाळा क्रमाक १ आहे . मागील वर्षीच शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण माजी मंत्री सुनिल तटक यांच्या हस्ते करण्यात आले या शाळा क्रमांक १ च्या पटागंणा भोवती घाणीचे साम्राज्य त्यामुळे श्रीवर्धन शाळा क्रमांक एक मधिल विद्यार्थ्यांच्या पालक वर्गामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे श्रीवर्धन नगरपालिका शिक्षण मंडळाच्या एकुन सात शाळा असुन त्या शाळा कोणत्या ना कोणत्यातरी समस्यानी ग्रासलेल्या आहेत . श्रीवर्धनशाळा क्रमांक १ हया नगरपालिकेच्या शाळेमध्ये सेमिइंग्लीश असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील बहुतांश नागरिकांनी आपल्या मुलाना शाळा क्र १ मध्ये दाखल करण्यासाठी पहिली पंसती दिलेली आहे त्यामुळे श्रीवर्धन शहरातुन हया मध्यवर्ती असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये आपलया विद्यार्थ्यांना धडे गिरविण्यासाठी दाखल केलेले आहे श्रीवर्धन शाळा क्रमाक १ च्या शाळेच्या पटांगणामध्ये पालापाचोळा , गवत , छोटीमोठी अनावश्यक झाडांची रोपे, चिखल अश्या प्रकारे हया पंटागणावर घाणीचे साम्राज्य परसलेले दिसत आहे त्यातच अधिक महत्वाचे म्हणजे जुन्या इमारतिचे कौलाचे मोठे ढिग तसेच सिमेंट विटाचे तुकडे यामुळे परिसराला डंपिग ग्रांऊडचे रूप प्राप्त झाले आहे . जुनी कौलारू इमारत पाडून त्या जागी नविन सिंमेट क्रॉकीटची इमारत बांधण्यात आलेली आहे . परंतु हया इमारतीच्या दोन्ही बाजुला जुन्या अर्धवट पाडलेल्या इमारती असल्यामुळे सदर इमारतीचा भाग अतिवष्टीमुळे कोसळून लहान विद्याध्यना त्या पासुन इजा होऊ शकते. शाळेच्या इमारतीच्या आजुबाजुच्या परिसरात व पटांगणामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे सरपटणारे प्राणी साप विचु यांचा संचार त्या परिसरात वाढू शकतो . त्यामुळे शाळेतील मुले पटांगणामध्ये खेळत असताना किंवा ये जा करित असतांना एखादया विषारी श्वापदाने दंश केल्यास विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतु शकेल याकडे श्रीवर्धन नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी व अध्यक्ष यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अश्या प्रकारे पंटागण व शाळेचा परिसर अस्वच्छ ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका उदभवु शकतो . या शाळेमधिल विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे नियमित स्वच्छ ठेवली जात नाहीत . तसेच शाळेच्या परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . तरी श्रीवर्धन नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने शाळा क्रमांक १ च्या पटांगणामध्ये अर्धवट तोडण्यात आलेल्या इमारतीचे अवशेष तसेच कौलाच्या व विटाच्या असलेल्या राशी व कचरा तातडीने साफ करून घ्यावा अन्यथा शिक्षण मंडळाला पालकाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी व अध्यक्ष यांच्या जवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता . ते उपलब्ध होऊ शकले नाहीत .

Post a Comment