दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन - लोणेरे मार्गावरील खामगाव घाटातील रस्त्यासह काम नुकतेच म्हणजे एप्रिल महिन्यात केलेले . मात्र रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे . पहिल्याच पावसात हा रस्त्या वाहून गेल्याचे दिसले . लाखो रुपये खर्चेन नुकत्याच बांधण्यात आलेल्या रस्त्याचे व रस्त्याच्या साईडपट्यांचे काम निकृष्ट असल्याचेच सिद्ध झाले आहे . हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माणगाव उपविभागामार्फत करण्यात आला होता . तर महाड येथील कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत याची निविदा प्रक्रिया केली होती . रस्त्याच्या कामात माती वापरली गेल्याने रस्ता वाहून गेल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे रस्त्याच्या साईडपट्टी भरण्यासाठी रस्त्यालगत असणाच्या झाडांच्या बुंध्याखालील माती वापरण्यात आली . त्यामुळे पावसाळ्यात हि झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मात्र याकडे ना वनविभागाचे लक्ष, ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष. रस्ता बनवल्यानंतर साईडपट्टया नियोजित पद्धतीने भरल्या न गेल्याने रस्ता वाहन गेला आहे . त्याला जबाबदार कंत्राटदार व अधिकार्यांवर कारवाईची मागणी होत आहे विशेष म्हणजे कामाचे निरीक्षण व परीक्षण न करता कंत्राटदाराला रक्कम दिली कशी जाते . रस्ता बांधणी करते वेळी पावसाळ्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी साईडपट्टा न दिल्याने पाणो रस्त्यावरून वाहताना दिसले .

Post a Comment