म्हसळा ग्रामीण रुग्णालययाची इमारत लय झाक ; पण आरोग्य सेवेची बोंब....



म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची इमारत लय झाक आहे पण आरोग्य सुविधांचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र आहे डॉक्टर आणि पुरेसा कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसत आहे . अनेकदा रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते . पाच वर्षे उद्घाटनाला झाल्यानंतर ८ महिन्यांपूर्वी रडत - खडत सुरु झालेल्या या ग्रामीण रुग्णालयात वर्ग दोनचे वैद्यकीय तिन अधिकारी , सात नर्स , १ वरीष्ठ लिपीक , १ कनिष्ठ लिपीक अशी पदे भरली गेली . तर अदापही वैद्यकीय अधिक्षक वर्ग एक १ पद रिक्त आहे . कार्यरत असलेले १ वैद्यकीय अधिकारी पी . जी . साठी व दोन राजीनामा देऊन गेल्याचे राज्याचे आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयांतून सांगण्यात आले . ग्रामीण रुग्णालय सुरु झाले म्हणून त्याच इमारतीत सुरु असलेले तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपले कार्यालय अन्यत्र हलविले तर प्राथमक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व अन्य कर्मचारी यांचे बस्तान इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हलविण्यात आले व म्हसळ्यातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामार्फत सेवा पुरविण्यात येतील , असा भास निर्माण केला . आजमितीस म्हसळ्यातील रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित असल्याचे चित्र आहे . तीस खाटांच्या रुग्णालयाला नवीन कोच्या ३० खाटा आणि काही अंशी साहित्य मीळाले आहे ते मागील पाच वर्षात वापरत नसल्याने गंजले आहे म्हसळ्यासाठी आलेले अन्य महत्वाचे साहित्य अन्यत्र हलले गेल्याचे अथवा त्याचे कोणतेही रेकॉर्ड सापडत नाही . नव्याने बांधलेले पी . एम् . रुमचीसुध्दा दुरवस्था असल्याने ती वापरात नाही . पी . एम . साठी मृतदेह मेंदडी येथे न्यावा लागतो . 

म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची सुरवातच खडतर व अडचणीची आहे , प्रशासकीय निर्णय व्यवस्था अपरीपक्व दिसते , उद्घाटन , सुरुवात व आता गैरसोय या सर्वांचा शिवसनेने चांगला अभ्यास केला आसल्याने म्हसळ्याची आरोग्याची समस्या शीवसेना सोडवू शकेल . 
 -नंदू शिर्के , तालुकाप्रमुख शिवसेना म्हसळा 

आरोग्याची सूत्रे व सेवा ठीक करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच पार पडू शकेल , येत्या काही दिवसांत योग्य सुधारणा झाल्यास पक्षाचे राष्ट्रीय सचिव आ . सुनील तटकरे यांच्या म र्गदर्शनाखाली स्थानिक पा तळीवर आंदोलन करुन समस्या सोडविण्यात येईल.
- समीर बनकर , राष्ट्रवादी काँग्रेस 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा