श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत ...

 श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन पावसामुळे    विस्कळीत 
● दरड कोसळणे, रस्ता खचणे, झाड पडणे यांचे सत्र सुरूच
● नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय यंत्रणा सज्ज
श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील जनते साठी यंदा चा पावसाळा त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसत आहेत .वादळ व   अती पर्जन्य यांनी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाली आहे .अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.7 जून पुर्वी पावसाचे आगमन झाले आहे .गेल्या तीन दिवसात मात्र पावसाने सर्वांना चांगलेच झोडपून काढले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहतुक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत. 
           श्रीवर्धन च्या भौगोलिक रचनेचा विचार करता तालुक्याच्या तिन्ही बाजूने  समुद्राचे वास्तव्य आहे. पर्यायाने समुद्रात निर्माण झालेल्या नैसर्गिक प्रक्रियेचा परिणाम सद्यस्थितीतील हवामानावर होत आहे.तीन दिवसात झालेले सर्वात जास्त पाऊस त्याचा परिणाम असू शकतो .
     श्रीवर्धन नगरपालिकेने पावसाळ्यापुर्वी नालेसफाई ची कामे व्यवस्थित पार पडल्यामुळे शहरात पाणी तुंबत नाही .मात्र मुख्य रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचते .नगरपालिका ते तहसील कार्यालय या दरम्यान असलेल्या   रस्ता चिखल युक्त बनला आहे. एस टी स्टँड च्या समोरील बाजूस  पाणी साचत आहे . दोन दिवस अगोदर  श्रीवर्धन च्या जीवना बंदरा जवळ झालेल्या वादळाने अनेक लोकांचे   आर्थिक नुकसान झाले आहे.शासनाने संबधित लोकांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत.
 श्रीवर्धन शहरा व्यतिरिक्त तालुक्यातील खेडे गावात दमदार पावसाने असंख्य अडचणी निर्माण केल्या आहेत. श्रीवर्धन शेखाडी मार्गावर। कोंडविल जवळ दरड कोसळण्याची शक्यता  पावसाळा सुरू झाल्या पासून निर्माण  झाली आहे.समुद्र किनाऱ्याच्या लगत असलेल्या आदगाव ,सर्वा ,नानवेली व दिघी या गावाच्या हद्दीत दरड कोसळण्यास वाव आहे .विशेष करून आदगाव ,सर्वा व नानवेली या तिन्ही गावांचे वाहतुकीचे रस्त्याच्या दुतर्फा डोंगर व दाट वनराई आहे. आदगाव सर्वा रस्त्याच्या कामासाठी उजव्या बाजूला असलेला डोंगर उकरण्यात आला आहे. त्यामुळे आदगाव सर्वा रस्ता दरड प्रवण क्षेत्र बनू शकतो. 
           काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आदगाव कुणबी वाडी चा जोड रस्ता अक्षरशः वाहून गेला आहे .कुणबी वाडीची लोकसंख्या  150 च्या आसपास आहे . जोड रस्त्याच्या शेजारील शेतकरी राजेंद्र शिंदे  यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे .जोड रस्ताच वाहून गेल्यामुळे दळण वळणास अडचणी येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील   वावे, नागलोली , धनगरमलई, आडी, कोलमांडला, जावेळे, गडबवाडी  भागात दाट जंगल आहे .पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडे रस्त्यावर आडवी होतात .

श्रीवर्धन तालुक्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे . नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे .वादळीपावसातील नुकसानग्रस्तांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल .
- जयराज सूर्यवंशी (तहसीलदार श्रीवर्धन)

आम्ही आमच्या नियोजित सर्व  फेऱ्या सोडलेल्या आहेत . आदगाव ,सर्वा ,दिघी मार्गावर वाहतुक निरंतर चालू आहे .प्रवाशी व शालेय विद्यार्थी यांना त्रास होणार नाही याची काळजी एस टी प्रशासन घेत आहे.
- रवी मोरे (वाहतुक नियंत्रक बोर्ली स्थानक )


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा