टू रीड ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था असून प्राथमिक शिक्षण,साक्षरतेसाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.ठाणे जिल्ह्यात सन 2016 पासून 125 शाळांमध्ये "शाळा वाचनालय कार्यक्रम" राबवत असून यामध्ये कल्याण मध्ये 29 ,मुरबाडमध्ये 29, अंबरनाथ मध्ये 18 तर भिवंडी मध्ये 49 बालवाचनालय सुरू आहेत.
या शाळा वाचनालयमार्फत शाळा व वस्ती स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मुलांना लहान वयातच वाचनाची आवड व सवय लागावी तसेच प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र वाचक बनावे हा ध्यास घेऊन संस्था आपले योगदान देत आहे.
शाळा सुरू असताना वाचन उपक्रम, गोष्टी सांगणे, मुलांना नवनवीन पुस्तकांची ओळख करून देणे, वाचण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे यांसारखे उपक्रम राबवले जातात ,मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले वाचन तसेच पुस्तकांपासून दूर जाऊ नयेत म्हणून देखील शाळा ,ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व रूम टू रीड चे वाचनालय प्रशिक्षक यांच्या सहकार्याने "उन्हाळी वाचनालय शिबीर" आयोजित केले जाते.
मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील उन्हाळी वाचनालय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या साठी सर्व मुलांसाठी गावामध्ये शाळेच्या वाचनालयाची पुस्तके खुली करण्यात आली होती. त्याचप्रमाणे वाचनालय प्रशिक्षक गावांमध्ये भेटी देऊन उपक्रमाची पाहणी करत त्याबरोबर मुले , पालक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत गोष्टी सांगणे, गोष्ट तयार करणे , कविता लेखन, कागदी वस्तू तयार करणे, बालगीते घेणे, चित्र रेखाटने यांसारखे विविध उपक्रम घेतले जात. या उपक्रमात पालक ही उत्साहाने सहभागी झाले होते. आनंदी वातावरणात मुलांना व पालकांना पुस्तकांच्या सहवासात आणणे या उन्हाळी वाचनालय शिबिरामुळे शक्य झाले.
Post a Comment