श्रीवर्धन जीवन कोळीवाडा रस्त्यावर पडलेत भगदाड ; श्रीवर्धन नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष...



श्रीवर्धन : भारत चोगले
जिवना कोळीवाडा येथिल जिवना जेटीवर जाणाऱ्या हया गजबजलेल्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहे . श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाडा हे महत्वाचे बंदर असुन हया जीवना जेटी जवळच शासनाचे दोन गोडावुन आहे . ते म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांसाठे हयाच गोडावुन मध्ये तालुक्यातील जनतेसाठी धान्य साठवून ठेवले जाते आणि हया ठिकाणाहून श्रीवर्धन तालुक्यातील कानाकोपर्यात रेशनिंग दुकानधारकांना धान्य गरजेप्रमाणे पोहचवले जाते. त्याच प्रमाणे हया ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचेही मोठे गोडावुन आहे त्या गोडावुन मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी अवश्यक असणारे साधन सामुग्रीचीही साठवुन ठेवलेली असते . शिवाय जीवना जेटीवर ताजी मासळीचा लिलाव बघण्यासाठी तसेच मासे खरेदी करण्यासाठी शिवाय जेटीवरिल पाण्यामध्ये लाटेवर डलवताना नौका पाहण्यासाठी नेहमीच राज्यभरातील पर्यटकांची गर्दी पहायला मिळते . हया ठिकाणी माश्याचा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याने मुंबई पुणे , नाशिक , गोवा , महाराष्ट्रातले तसेच महाराष्ट्राबाहेरचे व्यवसायिकदार माश्याची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्या गाड्या घेवुन येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरतो गाड्याची नेहमीच रेलचेल असते परंतु हया जिवना जेटवर जाण्याच्या मागांवर प्रभाकर पटेकर यांच्या घरासमोरील रस्त्यालगत मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना आपले वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते तसेच हा रस्ता गावमध्ये असल्याने हया ठिकाणी दररोज हजारो नागरिकांची ये - जा असते त्यामुळे पादचान्यांनाही त्या रस्त्यावरून ये जा करित असताना आपला जीव मुठीत धरून चालवे लागते. अन्यथा जीवित हानी होऊन प्राण गमवावा लागेल पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पडलेला खलु हा जास्तच मोठा होत जात आहे काही दिवसांनी तर या खड्यामुळे जिवना जेटीवर जाण्याचा संपर्क हि तुटण्याची शक्यता आहे. पावसाळा संपला कि या रस्त्यावर नागरिकांच्या वर्दळीचे प्रमाणात वाढ होत असते . तरी श्रीवर्धन नगरपालिकेने हया जीवना जेटीवर जाणार्या मार्गावरील रस्त्यावर पडलेला खट्स त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी नागरीकांमधून जोर धरत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा