वेळास : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यतील आदगांव ग्रामपंचात कार्य क्षेत्रातील कुणवाडी पाठेवाडी येथील रस्ता गुरुवार २१ जून रोजी दुपारी सतत चार तास पडलेल्या मुसळधार पावसाचा व डोंगर माध्या वरून आलेल्या पाण्याने बाहून गेल्याने जाण्या - येण्याचा मार्ग बंद झाला आहे . धोधो कोसळणाच्या मुसळधार पावसाने श्रीवर्धन तालुक्याला झडपले . संततधार पडलेल्या पावसात आदगांव ग्रामपंचायत हद्दीत असलेली पाठेवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली वाडी या वाडीवर अंदाजे ३० - ३५ घरे आहेत . लोकवस्ती जवळपास १०० / १२५ आहे . काबाडकष्ट करणारी वस्ती . त्यांना मोलमजुरीसाठी व मुलमुलींना शिक्षण , वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आदगांव येथे यावेलागते . बाजारहाट छोटी - मोठी खरेदी बोर्लीपंचतन येथे जावे लागते . २१ जून रोजी पडणाच्या मुसळधार पावसाने दोन्ही गावांना जोडणारा रस्ता वाहून गेल्याने त्यांचा मार्गच बंद झाला आहे दळण वळणाचे साधन पूर्ण ठप्प झाले आहे . बाहन गेलेल्या रस्त्यामुळे राजेंद्र शिंदे व रमेश शिदे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे कुणबीवाडीजवळ याच रस्त्याला जोडणारा साकव आहे तोही जीर्णवस्थेत असून तो कधीही कोसळून मोठा अपघात होऊ शकतो .

Post a Comment