म्हसळा तालुक्यातील खरसई येथे २८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर शारीरिक दुखापत झालेल्या सुनील गायकर यांना त्यांच्या समाजबांधवांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत देऊ केली . दोन सेमी लक्झरी एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये ३५ वर्षीय सुनील गायकर यांचा हात डॉक्टरांच्या सल्ल्याने कापण्यात आला तर पायाला कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे . श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनजवळ असणाऱ्या वाजळे येथील गायकर हे रहिवासी आहेत . घरातील एकमेक कर्त्या पुरुषाला कायमचे अपंगत्व आल्याने घरातील मंडळींना धक्का बसला आहे . सदर बातमी रायगड गवळी समाज सेवा संघातील काही सदस्यांना कळताच त्यांनी आपापल्या परीने आर्थिक स्वरूपातील मदत मिळवण्यासाठी धडपड सुरु केली . त्यांनी रायगड जिल्ह्यातील तसेच मुंबईतील गवळी समाज बांधवाना मदतीचे आवाहन केले . समाज बांधवांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला . गवळी समाज सेवा संघातील पदाधिकारी संपर्कप्रमुख अनिल कोटकर , उपसंपर्कप्रमुख संदेश दगे , सभासद जय खेडेकर , राजेश गायकर , परेश खेडेकर , उधेश गायकर , खुशांत पवार यांनी एकूण दहा हजार रुपयांची आर्थिक मदत सुनील गायकर यांच्या राहत्या घरी नालासोपारा येथे देऊ केली .
खरसई एसटी अपघातग्रस्त गायकार यांना समाजबांधवांचा मदतीचा हात ; आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी धडपड
Admin Team
0

Post a Comment