मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मस्त्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 107 वे सत्र 1 जुलै पासून शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणासाठी दरमहा रु.450/- इतके प्रशिक्षण शुल्क राहिल. दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींना दरमहा रु.100/- इतके प्रशिक्षण शुल्क असेल.
प्रशिक्षणार्थींच्या पात्रतेसाठी निकष पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 35 या मर्यादेत असावे. उमदेवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. उमेदवारास मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराकडे बायोमेट्रीक कार्ड असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात अर्ज व संस्थेची शिफारस आवश्यक आहे. उमेदवार दारिद्रय रेषेखालील असल्यास संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक युवकांनी स्वत:चे हस्ताक्षरात विहित नमुन्यात अर्ज व संस्थेशी शिफारस या कार्यालयाकडे 21 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी सादर करावेत असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment