जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावेत...

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी (शास्त्र) या वर्गात शिक्षण घेत असलेल्या  व जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे  अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना आवाहन करण्यात येते की ज्या अर्जदारांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी या समितीकडे प्रलंबित आहेत.  
तरी ज्यांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी या समितीच्या कार्यालयाकडे आपणाकडे उपलब्ध जातनोंदविषयक कागदपत्रांच्या मूळ व सत्यप्रतींसह समक्ष उपस्थित राहून त्रूटींची पूर्तता करावी जेणेकरुन आपली पुढील प्रवेशप्रक्रिया सुलभ होईल.  अधिक माहितीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती,दुसरा मजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ, गोंधळपाडा अलिबाग दूरध्वनी क्रमांक 02141-228603 येथे संपर्क साधावा असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा