श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस, विद्यत महामंडळाचा लपंडाव सुरू ; डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका



श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

श्रीवर्धन तालुक्यात काल रात्री पासून पावसाने थैमान घातले आहे .काल रात्रभर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे .त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .तालुक्यातील कोलमांडला आडी रस्त्यावर प्रचंड वृक्ष उन्मळून पडला आहे त्यामुळे सदर मार्गावर वाहतुक बंद करण्यात आले आहे.एस टी च्या सायंकाळ पर्यंत च्या नियोजित फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे.सदर मार्गावर दैनंदिन वाहतुक विरळ प्रमाणात चालते .
    तालुक्यातील   श्रीवर्धन शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे  दरड कोसळण्याचा धोका संभवतो असे निदर्शनास येत आहे .कारण सदर रस्त्यावर काही प्रमाणात दगड व माती रस्त्यावर येणास प्रारंभ झाला आहे. शासन दरबारी योग्य हालचाली होण्याची जनता वाट पाहत आहे .शेखाडी ते दिवेआगार पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पर्यटक व स्थानिक लोक यांच्या सुरक्षतेसाठी योग्य वेळी पावले उचलणे नितांत आवश्यक आहे .
      श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी सरकारी नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे झाल्याचे बोलले जाते .त्यामुळे पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत आहेत .डोंगराळ भागात समुद्र किनाऱ्यावर अनाधिकृत बांधकामे जोर पकड आहेत  पर्यायाने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा