म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ विद्यालयात दि . २१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योग दिना निमित्य योग म्हणजे काय योगाचे महत्व या धावपळीच्या युगात योगाची गरज का आहे याची सर्व माहिती शिक्षक एस . व्ही . सदलगे सर यांनी विद्यार्थींना समजावून सांगितले तसेच प्राणायम उभी आणि बैठे आसने विद्यार्थ्यांना केले . यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनीही योगासने केली . यावेळी मुख्याध्यापक अत्तार एस . बी . शिक्षक एस . व्ही . सदलगे , व्ही . पी . पवार , आर . एन . जाधव , एच . आर काळेकर उपस्थित होते.

Post a Comment