श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन शहरामध्ये श्रीवर्धन एसटीच्या शहरातील मार्गावर रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांमुळे व गुरांच्यामुळे श्रीवर्धन शहरामध्ये येणार्या जाणार्या वाहकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे . सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे . पावसाळ्यामुळे बर्याचवेळा रस्त्यावरील लाईट जात येत असते . त्यामुळे अंधारामध्ये हे रस्त्यावर बसलेले कुत्रे व गुरे यांच्यामधुन येजा करित आसताना जीवितहाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे श्रीवर्धन नगरपालिकेकडून अशा भटक्या जनावरांवर तसेच मालकांवर कोणतेही कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे . श्रीवर्धन शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने श्रीवर्धन एसटीस्टेंड येथे पर्यटक व स्थानिक नागरिकांची नेहमीच वर्दळ असते . पंरतु या भटक्या जनावरांमुळे नागरिक रात्रीच्या वेळी त्रस्त झाले आहे . श्रीवर्धन शहरामध्ये मुंबई , पुणे , ठाणे व इतर ठिकाणाहून ज्या एसटी रात्रीच्या वेळी सुटतात त्या सर्व गाड्या श्रीवर्धन शहरामध्ये पहाटेच्या वेळ येत आसतात . या एसटी श्रीवर्धन शहरामध्ये आल्या नंतर श्रीवर्धन शहरमध्ये एसटी राउंड मारतांना त्या एसटी वाहकाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे . शहरातील श्रीवर्धन एसटी आगार , शिवाजी चौक भरबाजरपेठ येथिल पुल नारायण पाखाडी , चौकरपाखाडी नाका , तसेच गहुँचा नाका , गुरवआळी , महेश्वरपाखाडो , जिवनेश्वर नाका या ठिकाणी रात्रीच्या वेळ भटकी जनावरे रस्त्यावर वसलेली असतात . काही वेळा लाईट गेल्यामुळे अंधार असतो तर काहीवेळा मुसळधार पाऊस असतो अशावेळी वाहन चालकाला गाडी पुढे नेताना अडचण निर्माण होते . श्रीवर्धन नगरपालिकेने भटक्या मोकाट गुराच्या मालकांवर ठोस अशी कारवाई करावी अशी मागणी श्रीवर्धन शहरातील नागरिकांमधुन केली जात आहे .
रात्रीच्यावेळी रस्त्यावर वसलेल्या गुरांच्या मालकांवर श्रीवर्धन नगरपालिकेमार्फत ठोस कारवाई करण्यात येईल . आपल्याकडे कोंडवाडा नसला तरी अशी पकडलेली गुरे इतर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतील जेणे करून अशा मोकाट रात्रीच्या वेळी गुरेढरे सोडणान्या मालंकाना धडा मिळेल . कोणतेही जीवितहाणी होणर नाही याची श्रीवर्धन नगरपालिकेकडून आता काळजी घेतली जाईल.
- नरेंद भुसाणे , नगराध्यक्ष

Post a Comment