श्रीवर्धन मतदारसंघात भाजप स्वबळावर लढणार...

श्रीवर्धन मतदारसंघात भाजप स्वबळावर लढणार,शिवसेने सोबत युती झालीच तर मतदारसंघासह जिल्ह्यात भाजप तीन विधानसभा जागेचा हक्क सांगणार-कृष्णा कोबनाक

म्हसळा- बातमीदार

भारतीय जनता पक्ष राज्यातील तालुका गावपातळीवर केंद्र आणि राज्य सरकारचे माध्यमातून विविध लोकपयोगी योजनेमधून जोमाने विकास कामे करीत आहे. श्रीवर्धन मतदारसंघात आम्ही केंद्रीय आणि  मुख्यमंत्री,पालकमंत्री,जिल्हा पालकमंत्री आणि आमदार यांचे माध्यमातून भरघोस विकास कामे करीत आहोत.विकास कामाचे जोरावर आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक शिवसेने सोबत युती झाली नाही तर स्वबळावर लढणार असे संकेत भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा येथे पक्ष कार्यालयात पत्रकारांजवळ त्यांचे वाढदिवसाचे निमित्ताने वार्तालाप करताना सांगितले.

भाजप सरकारला देशात 26 मे 2018 रोजी 4 वर्षे पुर्ण झाली आहेत या चार वर्षांत भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेऊन देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले आहे त्या औचित्याने भारतीय जनता पक्षाने चार वर्षे विकासाची ,समृद्धी, विश्वासाची,नवभारत आणि नवनिर्माणाची असा तालुका स्तरावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या वेळी कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना रायगड जिल्हा लोकसभेत शिवसेना आपले हक्क सांगणार असेल तर भाजप पक्ष विधानसभा निवडणुकीतआमदारकीच्या 6 पैकी 3 जागांवर हक्क मागेल त्यात श्रीवर्धन मतदारसंघात मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल असेही स्पष्ट केले. मागील विधानसभा निवडणुकीत मी भाजप पक्षा कडून निवडणूक लढवीली आहे.आता ही उमेदवार म्हणून मी असणार आहे. निवडणुक लढविलेल्या कार्यकर्त्याला पहिला प्राधान्य दिले जाईल असा ठरावही पक्षाने केला असल्याचे कोबनाक यांनी सांगितले.जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचे भाजप पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे समावेत तालुका अध्यक्ष शैलेश पटेल,भाजप मुंबई विभाग अध्यक्ष मदन वाजे,जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश म्हशीलकर,जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर,जिल्हा युवा चिटणीस महेश पाटील,तालुका चिटणीस प्रकाश रायकर,तुकाराम पाटील,शहर अध्यक्ष मंगेश मुंडे,युवा मोर्चा अध्यक्ष शरद चव्हाण, महिला अध्यक्षा मीनाताई टिंगरे,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष समीर धनसे, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्ष मनोहर जाधव, किसान मोर्चा अध्यक्ष सुनिल शिंदे,श्री प्रकाश कोठवले आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. चार वर्षे नवभारत आणि नावनिर्माणाची प्रसार आणि प्रचार करण्यासाठी म्हसळा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आसुन मोटारसायकल रॅली,स्वच्छता मोहीम आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असा दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हसळा तालुक्यात केंद्रीय दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी,मा. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री ना. पाटील साहेब यांनी रस्ते विकास सुधारणा कामास म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन मतदारसंघात विशेष प्राधान्य दिले आहे, नेवरूळ ते सांगवड,पाष्टी ते पांगलोली,धोरजे ते कुडतुडी,चिरागाव ते कोळवट या गाव जोड रस्त्यास मंजुरी दिली आहे यातील काही कामे पुर्ण तर काही कामे प्रस्तावित आहेत.दिघी पुणे रस्ता विकास कामाला जोरदारपणे सुरवात होऊन हे काम अवघ्यादोन वर्षात पुर्ण होईल यामुळे म्हसळा तालुका शहरातील ट्रॅफिक समस्या कायमची सुटण्यासाठी मदत होणार आहे.तालुका शहरात आम्ही राज्य शासना मार्फत बाजारपेठ सुधारण्यासाठी आणि सुसज्य एस.टी.स्थानक बनविण्यासाठी निधीची मागणी केली असल्याचे कोबनाक यांनी माहिती देताना सांगितले.आम्ही केवळ निवडणुका लढविणार नसुन जनसामान्य लोकांची समस्या जाणून विकास कामे करीत आहोत. भारतीय जनता पक्ष गावपातळीवर जोमाने वाढत असल्याचे त्यांनी वार्तालाप करताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा